Parbhani News: परभणी व हिंगोली जिल्ह्यांत यंदा पावसाचा उद्रेक झाला आहे. शनिवारी (ता.२७) सकाळी साडेआठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये या दोन जिल्ह्यांतील ८२ पैकी ४० मंडलांत अतिवृष्टी झाली. त्यात १४ मंडलांत १०० मिमीपेक्षा जास्त, तर २६ मंडलांत ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम, पूर्णा येथे गंभीर पूरस्थिती उद्भवली आहे. .गोदावरी नदीच्या प्रवाहात नद्या, नाल्यांचे प्रवाह मिसळत नसल्यामुळे तुंबलेले पाणी पिकांमध्ये घुसल्याने हजारो हेक्टरवरील पिके पाण्यात बुडाली. पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे..Solapur Heavy Rain: कोणत्याही शासकीय विभाग प्रमुखांनी मुख्यालय सोडू नये.परभणी जिल्ह्यातील ५६ हजार ८३६ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील ९ हजार ५०० हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर पिके वाया गेली. हळद, फळे-भाजीपाला पिकांची नासाडी झाली. परभणी जिल्ह्यातील परभणी, सोनपेठ, गंगाखेड,पालम,पूर्णा तालुक्यातील २१ मंडलात अतिवृष्टी झाली..त्यापैकी ८ मंडलांत १०० मिमीपेक्षा जास्त, तर १२ मंडलांत ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. मागील २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी ५८.१ मिमी, तर सप्टेंबर महिन्यात आजवर सरासरी ३०४.६ मिमी (२००.३ टक्के) पाऊस झाला. यंदा १ जून पासून आजवर सरासरी ८७४.५ मिमी (११७.५ टक्के) पाऊस झाला..Solapur Heavy Rain: माढा, मोहोळमध्ये रौद्ररूप .हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यातील १९ मंडलात अतिवृष्टी झाली. त्यापैकी ६ मंडलात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. मागील २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी ६६.२ मिमी, तर सप्टेंबरमध्ये आजवर सरासरी ३४०.९ मिमी (२४४.९ टक्के) पाऊस झाला. १ जूनपासून आजवर सरासरी १०६३.१ मिमी (१३६.३ टक्के) पाऊस झाला..गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांत पूरस्थिती गंभीरजिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा, पालम तालुक्यांमध्ये गंभीर पूरस्थिती उद्भवली आहे. गळाटी नदीच्या पुरामुळे गंगाखेड ते पालम, गंगाखेड ते राणीसावरगाव रस्ता बंद झाला आहे. पूर्णा ते नांदेड वाहतूक बंद केलेली आहे. नाव्हा (ता.पालम) व पालम शहरातील काही व्यक्तींना घरात पाणी शिरल्याने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. चुडावा (ता.पूर्णा) येथे पुरात, तर शेख राजूर (ता.पालम) .येथे शेतात अडकलेल्या २ व्यक्तींना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. गुळखंड-जवळा (ता.पालम) येथे पुराचे पाणी गावात आल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले असल्याचे गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, औंढानागनाथ तालुक्यांत पूरस्थिती उद्भवली. चौंढी बहिरोबा (ता.वसमत) बिबथर व कोंढूर डिग्रस (ता.कळमनुरी) गावांचा संपर्क तुटला होता..१०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झालेली मंडले....परभणी जिल्हा ः गंगाखेड १०६,राणीसावरगाव १४३,पिंपळदरी १११.३.पालम १५३.३,चाटोरी १४३,बनवस १३९.८,पेठशिवणी १११.५,रावराजूर ११३.हिंगोली जिल्हा ः कळमनुरी १०३.८,वाकोडी १०७,वसमत १२८.८,आंबा ११२.३,हयातनगर १२८.८,कुरुंदा १०.४.८..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.