Rainfall Data Of Kharif: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत मंगळवारी (ता. २३) दुपारनंतर अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. कमी-अधिक प्रमाणात झालेल्या या पावसाचे प्रमाण छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत अधिक राहिले. या दोन्ही जिल्ह्यांतील एकूण नऊ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे..बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे ज्या भागांत पेरणीयोग्य पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी खरीप पेरण्यांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अतिवृष्टी झालेल्या मंडलांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच आणि जालना जिल्ह्यातील चार मंडलांचा समावेश आहे..Soil Moisture: जमिनीतील पेरणीयोग्य ओलावा कसा ओळखायचा?.या कालावधीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी १९.९ मिलिमीटर, जालना जिल्ह्यात २१ मिलिमीटर, तर बीड जिल्ह्यात ३.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काही भागांत मंगळवारी दुपारनंतर, तर काही मंडळांत बुधवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात दुपारी एक वाजेपर्यंत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या..मोसमी पावसाची सर्वदूर सक्रियता अद्याप झालेली नसल्याने काही भागांत झालेल्या पावसाच्या भरवशावर खरीप पेरण्या करण्यात आल्या होत्या. उगवलेल्या पिकांना सध्या पावसाची नितांत आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून रखडलेल्या पेरण्यांनाही गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे..Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर.जालना जिल्हारामनगर १०९.५०धनगरपिंपरी ९१.००जालना शहर ८७.००पाचनवडगाव ८७.००.अतिवृष्टी झालेली मंडले(पाऊस मिलिमीटरमध्ये)छत्रपती संभाजीनगर जिल्हाआडूळ ९८.७५भराडी ८४.२५कचनेर ८०.००बालानगर ७८.७५बोरगाव ६९.००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.