Satara News : यावर्षी पावसाचा कालावधी वाढल्यामुळे ऊस गळीत हंगाम एक महिना उशिराने सुरू होत आहे. सध्या कारखान्यांनी बॉयलर पेटण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी जिल्ह्यात गाळपास तब्बल एक लाख हेक्टरवरील ऊस उपलब्ध आहे. मात्र, लांबलेला पाऊस आणि शेतात तुंबलेले पाणी यामुळे हार्वेस्टरच्या वापरावर मर्यादा येणार आहेत. .तर दुसरीकडे ऊस वेळेत जाण्याबरोबरच ऊस दराबाबत शेतकऱ्यांत चिंता आहे. यावर्षी साखर उताऱ्यानुसार ३२०० ते ३५०० रुपये प्रतिटनापर्यंत पहिली उचल होण्याची शक्यता असून अंतिम दर हा साखर उताऱ्यावर अवलंबून राहणार आहे. हंगामाची तयारी सुरू झाली ऊसतोड मजूर येण्यास सुरुवात झाली आहे..ऊस गळीत हंगामाला यावर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. उसाची चांगली वाढ झालेली नाही. त्यामुळे उत्पादनावर परिणाम जाणवणार आहे. या वेळेस जिल्ह्यातील सहकारी नऊ आणि खासगी आठ असे एकूण १७ साखर कारखाने गळीत करणार आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी दोनपेक्षा जास्त कारखान्यांकडे ऊस नोंदणीचा पर्याय ठेवला आहे. .पण, तरही कऱ्हाड, खटाव सातारा तालुक्यांच्या काही परिसरात सांगली, कोल्हापूर कारखान्यांकडून तर फलटण, वाई, कोरेगाव तालुक्यांतून बारामतीच्या साखर कारखान्यांकडून उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. .Sugarcane Crushing Season : कर्नाटकात जाणाऱ्या उसाबाबत तोडगा काढू.जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी क्षमता वाढवलेली असल्याने पूर्ण क्षमतेने चालवून गाळप उरकण्यावर भर राहणार आहे. त्यासाठी हार्वेस्टरच्या माध्यमातून तोडणीला प्राधान्य दिले जाणार होते. पण, पावसामुळे हार्वेस्टरच्या वापरावर मर्यादा येणार आहेत. पर्यायाने तोडणी वाहतूक यंत्रणा ही कारखान्यांनी हाताशी ठेवली आहे..शेतकरी संघटनांनी यावर्षी उसाला किमान हंगाम उशिरा असून शेतकऱ्यांवर संकट आलेले आहे. सरकार वारंवार खोटी आश्वासने देऊन डोकेदुखी वाढवत आहे. पावसामुळे शेतकरी अधिकच संकटात जात आहे. मराठवाडा, विदर्भातील शेतकरी अडचणीत असताना राज्य व केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून मदत व्हायला हवी होती..Sugarcane Crushing Season: गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून.ऊस दरावर चर्चाच नाही...यावर्षी ऊस दराचा प्रश्न फारसा चर्चेला आलेला नाही. कारण केंद्र शासनाने एफआरपी वाढवून दिलेली आहे. तरीही साखर उताऱ्यानुसार यंदा ३२०० ते ३५०० पर्यंत पहिली उचल जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या गाळप केलेल्या उसाला दुसरा हप्ता केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच कारखान्यांनी दिला आहे. .तसेच यावर्षीचा अंतिम दर हा कारखान्याच्या रिकव्हरीवर कमी जास्त असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष पहिल्या उचलीवर असेल. कारण यावर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी नेत्यांचे कारखाने थोडा हात ढिला सोडण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.