Sindhudurg News : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. ऐन गणेशोत्सवात पावसाचा जोर वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. हवामान विभागाने २८ ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट दिल्यामुळे चिंता वाढली आहे..जिल्हयात मुसळधार पाऊसानतंर चार पाच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाली. दुपारनंतर पावसाचा जोर वाढत गेला..Maharashtra Rain Forecast: घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’.त्यामुळे जिल्ह्यातील नदीनाल्यांच्या पाणीपातळी देखील वाढ होण्यास सुरूवात झाली. गणेशोत्सवात पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी या तालुक्यांमध्ये जोरदार सरी बरसत आहेत. पावसामुळे गणेशमूर्ती नेताना गणेशभक्तांची मोठी तारांबळ उडाली..India Heavy Rain: देशभरात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, प्रशासन सतर्क.तालुकानिहाय पावसाची नोंद (मिमीमध्ये)तालुका पावसाची नोंदकणकवली ११५ सावंतवाडी ६९दोडामार्ग ६१वैभववाडी ५७वेंगुर्ला ४१कुडाळ ४०देवगड ३९मालवण १७ .दुष्टिक्षेप...कणकवली तालुक्यात सर्वाधिक पाऊस: ११५ मिमी, अतिवृष्टीची नोंद.सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी या तालुक्यांतही जोरदार पाऊस.इतर तालुक्यांत हलका ते मध्यम पाऊस..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.