Parbhani News : परभणी व हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी (ता. १८) सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये या दोन जिल्ह्यांतील ६६ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. .परभणीतील बामणी (ता. जिंतूर) मंडलात ९४.५ मिमी अतिवृष्टीची नोंद झाली. पाऊस उघडीप देत नसल्यामुळे पीकहानीची व्याप्ती वाढत चालली आहे. मागील २४ तासांमध्ये परभणी जिल्ह्यातील ५२ पैकी ४२ मंडलांत हलका ते मुसळधार पाऊस झाला. .Maharashtra Heavy Rainfall: अतिवृष्टीचा ३० जिल्ह्यांना फटका.जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा तालुक्यांतील अनेक मंडलांत जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी १७.६ मिमी तर सप्टेंबरमध्ये आजवर सरासरी १४९.१ मिमी (१४७ टक्के) पाऊस झाला. यंदा १ जूनपासून आजवर सरासरी ७१९.० मिमी (१०३.६ टक्के) पाऊस झाला..Marathwada Rainfall : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील पावसाचा जोर झाला कमी.हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी २४ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. कळमनुरी, वसमत, सेनगाव या तालुक्यांतील काही मंडलांत पावसाचा जोर होता. मागील २४ तासांमध्ये सरासरी ५.१ मिमी तर सप्टेंबरमध्ये सरासरी १६७.५ मिमी (१८०.५ टक्के) पाऊस झाला. यंदा १ जूनपासून आजवर सरासरी ८८९.७ मिमी (१२१.३ टक्के) पाऊस झाला..मंडलनिहाय पाऊस (१० मिमीच्या पुढे)परभणी जिल्हा ः परभणी ग्रामीण २४.३, सिंगणापूर १०, दैठणा १८.८, पिंगळी २४.३, जिंतूर २६, सावंगी म्हाळसा २४.८, बोरी २०.३, चारठाणा ५४.८, सेलू ५१.३, देऊळगावगात ५१.३, वालूर २२, कुपटा १३.३, चिकलठाणा ५४, मोरेगाव ४०, मानवत ४२.५, कोल्हा ४०.८, ताडबोरगाव ४९.५, हादगाव ४७.८, कासापुरी ११.५, आवलगाव ३४.८, शेळगाव ३४.८, महातपुरी ३०, पूर्णा २३.३, चुडावा ३१.३.हिंगोली जिल्हा ः डोंगरकडा २२.३, अंबा ४५, हट्टा १२.३, हत्ता २४.८..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.