Solapur News : ऑगस्ट महिन्याच्या पंधरवड्यात माढा व करमाळा वगळता सर्वच तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. यंदाच्या पावसाळ्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात सरासरीच्या २२० टक्के तर उत्तर सोलापूर तालुक्यात १४२ टक्के पाऊस झाला आहे. चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने सोलापूर शहरातील काही भागात आदिला नदीचे पाणी घुसले. .सीना कोळेगाव धरणातून सीना नदीत ३० हजार क्युसेकचा विसर्ग सोडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने दक्षिण तालुक्यातील नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.हिप्परगा तलाव भरल्याने एकरूख उपसा सिंचन योजनेतून दक्षिण तालुक्यातील हणमगाव, रामपूर व धुबधुबी तलाव भरून घेण्यात आले आहेत. १ ते १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ५५.५० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना १०४ मिलिमीटर (१८७.४० टक्के) पावसाची नोंद झाली आहे..Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार.उत्तर सोलापूर ६९.१० मिलिमीटर सरासरी असून प्रत्यक्षात २०८.३० मिलिमीटर(३०१ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण सोलापूर ७६.१० मिलिमीटर अपेक्षित असताना १६७.४० मिलिमीटर, बार्शी ६४.३० अपेक्षीत असताना ११५.७० मिलिमीटर, अक्कलकोट ७०.५० अपेक्षित असताना १३५.५० मिलिमीटर, मोहोळ ५५.८० अपेक्षित असताना १०७.५० मिलिमीटर, माढा ५८.३० अपेक्षित असताना ९३.५० मिलिमीटर, करमाळा ५०.२० अपेक्षित असताना ३८.३० मिलिमीटर, पंढरपूर ५७.२० अपेक्षित असताना ७४.४० मिलिमीटर, सांगोला ४९.३० अपेक्षित असताना १०१ मिलिमीटर, माळशिरस ३९.७० अपेक्षित असताना ८३.४० मिलिमीटर तर मंगळवेढा ४६.८० अपेक्षित असताना ८३.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे..दक्षिणमधील पावसाची सरासरीदक्षिण सोलापूर तालुक्यात २८२.५० पाऊस अपेक्षित असताना ४१६ मिलिमीटर (१४७.४० टक्के ) पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्टच्या १४ दिवसांत १६७.४० मिलिमीटर (२२० टक्के ) पावसाची नोंद झाली आहे. बोरामणी मंडळात ५२३ मिलिमीटर (१८५ टक्के), वळसंग ३८३.८० (१३५.९०), मंद्रुप ४४४.४० (१५७.३०), होटगी ३२७.५० (११५.९०), मुस्ती ५०६.६० (१७९.३०), निंबर्गी ४४५.१० (१५७.६०), तर विंचूर मंडळात २८४.६० (१००.७०) पाऊस झाला आहे..उत्तरमधील पावसाची सरासरीउत्तर सोलापूर ३०८.९० मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता, प्रत्यक्षात ३८९ मिलिमीटर (१२६ टक्के) पाऊस झाला आहे. यापैकी ऑगस्ट महिन्यातील १४ दिवसात २०८.३० मिलिमीटर पाऊस बरसला आहे. शेळगी मंडळात ३९९ मिलिमीटर (१२९ टक्के,) मार्डी मंडळात ४३८.८० मिलिमीटर (१४२ टक्के), वडाळा मंडळात ३७१ मिलिमीटर, (१२० टक्के) तर सोलापूर मंडळात ४९१ मिलिमीटर (१५९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे..Heavy Rain Maharashtra : मराठवाड्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ.चार दिवस हलका ते मध्यम पाऊस..भारतीय हवामान विभागाने १६ ते २० ऑगस्ट राज्यातील काही जिल्ह्यात रेड व यलो अलर्ट दिला असला तरी सोलापूर जिल्ह्यासाठी कोणताही अलर्ट दिला नाही. पण पुढील चारही दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. १७ ते १९ ऑगस्ट हे तीन दिवस पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात रेड व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे..संयुक्त पंचनामा करण्याचे आदेश...दक्षिण सोलापूर तालुक्यात बोरामणी व मुस्ती मंडळात ५०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी व तहसीलदार किरण जमदाडे यांनी वडजी वरळेगाव, बोरामणी, बक्षी हिप्परगे व दोड्डी या गावातील नुकसानीची पाहणी केली. सोयाबीन व उडीद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. १० दिवसातच २२० टक्के पाऊस झाल्याने पिकांना फटका बसला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.