Solapur News : सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यातील काही भागात गुरुवारी (ता. १२) मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे काढणीस आलेल्या सोयाबीन, उडीद, कांदा, मका यासह विविध फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. .६५ मिलिमीटरची अट न लावता बाधित क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे. मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर, शिरापूर, भांबेवाडी, हिंगणीसह परिसरातील गावांत मोठ्या प्रमाणात गुरुवारी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. .Crop Damage Compensation : एक महिना होऊनही मिळेना मदत.त्याची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खासदार शिंदे शुक्रवारी (ता. १२) तालुक्यातील बाधित गावांच्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून चर्चा केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, उपाध्यक्ष राजेश पवार, अरुण पाटील आदींसह त्या-त्या गावातील शेतकरी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते..यावेळी खासदार शिंदे यांनी मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर येण्यासाठी पाच वर्षे लागतील. काही पर्जन्यमापकही झाडाखाली आहेत, अशा तक्रारी काही शेतकऱ्यांनी केल्या..Crop Damage Compensation : सरकारने पुसली अतिवृष्टिग्रस्तांच्या तोंडाला पाने.जेव्हा तुम्ही येऊन बघता त्यावेळी तुम्हाला नुकसान दिसतेच. मग त्याला अट कशासाठी? ६५ मिलिमीटरचा आदेश बदलण्याचे काम तुमचे आहे. जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुमच्या बैठका होतात, त्यावेळी आपण हा नियम बदलासाठी आग्रह धरावा..जिल्हाधिकाऱ्यांना पत्रखुनेश्वर, भांबेवाडीसह अन्य गावांत ६५ मिलिमीटरपेक्षाही जादा पाऊस झाला आहे; मात्र त्याची नोंद मंडल स्तरावर झाली नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने प्रत्यक्ष पाहणी करून बाधित क्षेत्राचे सरसकट पंचनामे करावेत, असे पत्र खासदार शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.