Satara News : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १८) रात्री अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडासह दमदार पाऊस झाला आहे. विशेष करून खटाव तालुक्यातील कलेढोण, मायणी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. .यामुळे चांद, येरळा नदीला पूर आल्याने अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली होती. तर पावसामुळे शेतातील ऊस, मका, आले, बटाटा, कांदे, उडीद यासारखी पिके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी २५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली..Hingoli Crop Damage: ऑगस्टमध्ये दोन लाख हेक्टरवर नुकसान.दुष्काळी खटाव पूर्व भागात ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. या परिसरातील मायणी, कान्हरवाडी, हिवरवाडी, कलेढोण, पडळ, विखळे, हिवरवाडी, कान्हरवाडी, कानकात्रे या गावांना पावसाने झोडपून काढले. .कानकात्रे, मायणी येथील ब्रिटीकालीन तलाव ओसंडून वाहिल्यामुळे मायणी-कानकात्रे-म्हसवड हा रस्ता रात्री पाण्याखाली गेल्यामुळे याच मार्गावर रस्त्यावर मोठे झाड पडून वाहतूक बंद झाली. मायणीत आलेल्या चांदनदीला आलेल्या पुरामुळे मायणी-लक्ष्मीनगरचा संपर्क रात्रीपासून तुटला होता. मायणी बायपासला लागून महादेव मंदिराकडे जाणारा पूल पाण्याखाली गेला..तर चितळी-शेडगेवाडीला गव्हाण वस्तीजवळचा साकवही पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. शेतात पाणी साचून राहिल्याने मका, ऊस, आले, कांदा, बटाटा, उडीद आदी पिके पाण्याखाली गेली. .Soybean Crop Damage: तीस टक्के सोयाबीनला पावसाचा जबर फटका.जोरदार झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने बटाटा कुजण्याची शक्यता वाढली आहे. एकट्या खटाव तालुक्यात २४ तासांत ७४ मिमी पाऊस झाला आहे. तसेच कोरेगाव, माण या दुष्काळी तालुक्यांसह सातारा, कऱ्हाड या तालुक्यांत अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. मध्यरात्री पावसाचा जोर अधिक होता..वाई, जावळी, महाबेश्वर, फलटण, खंडाळा या तालुक्यांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतीतील कामे ठप्प झाली आहेत. काढणीला आलेला घेवडा पिकांचे नुकसान होणार आहे, तसेच महाबळेश्वक, जावळी तालुक्यातील स्ट्रॉबेरी लागवड थांबणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.