Pune News : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. शनिवारी (ता. २७) सायंकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. रविवारी (ता. २८) सकाळी आठपर्यंत घोडेगाव येथे सर्वाधिक १२१ मिमी पाऊस पडला असून जिल्ह्यातील १५ मंडलांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. या पावसामुळे पिकांच्या नुकसानीत वाढ होत असल्याने शेतकरी अडचणीत येत आहेत..सध्या राज्यासह पुणे जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. गेल्या आठवड्यात शिरूर, बारामती, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर भागांत मुसळधार पाऊस बरसला. त्यानंतर पुन्हा जुन्रर, खेड, आंबेगाव, मावळ या तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. यात मावळ तालुक्यातील चार मंडलांत अतिवृष्टी झाली..तर जुन्नरमधील दोन मंडले, खेडमधील सात मंडले, आंबेगावमधील दोन मंडलांचा समावेश आहे. त्यामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान होत आहे. प्रामुख्याने धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वेगाने वाढत आहे..Rainfall Update : वाशीम, अकोल्यात पावसाचा पुन्हा जोर.पवना धरण शंभर टक्के भरले आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात १४०० क्युसेकने विसर्ग चालू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसास चांगलीच सुरुवात झाली असून रविवारी (ता. २८) सकाळी साडे दहापर्यंत नदीपात्रात होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून एकूण विसर्ग २८८० क्युसेक करण्यात आला. मुळशी धरण ९९.५८ टक्के भरले आहे. पाऊस कमीअधिक प्रमाणात होत आहे. .त्यामुळे पाणी पातळीत वाढ, घट होत आहे. मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत ३३२० क्युसेकने सुरू असणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून दुपारी १२ वाजता ७००० हजार क्युसेक करण्यात आला. वडीवळे धरणाचा पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सांडव्यातून कुंडली नदीपात्रात सुरू असलेला २७२९ क्युसेक्स विसर्ग वाढवून रविवारी दुपारी १२ वाजता ५२१६ क्युसेक्स करण्यात आला. .Rain Damage Compensation : खरडून गेलेल्या जमिनीचे अचूक पंचनामे करा.पाऊस वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी, जास्त करण्यात येईल. त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले..रविवारी (ता. २८) सकाळी आठपर्यंत ६५ मिमीहून अधिक झालेला पाऊस : स्त्रोत - कृषी विभागवडगाव, तळेगाव, टाकवे, वाडेश्वर ७२, राजूर, आपटाळे १२०, वाडा ७७, राजगुरूनगर ८३, कुडे ७७, पाईट ८२, कडूस ७०, वेताळे ७७, करंजीविहीर ८२, घोडेगाव ६७, आंबेगाव १२१रविवारी (ता. २८) सकाळी साडे दहा वाजता धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेला विसर्ग : क्युसेकमध्ये.पिंपळगाव जोगे २५००, येडगाव ५७००, वडज १२,०००, डिंभे २९९८००, घोड ९०००, विसापूर १०५०, चिल्हेवाडी ११००, कळमोडी ३२८४, चासकमान २०८१०, भामा आसखेड १३३१२, वडीवळे २७२९, आंद्रा ९८०, पवना २१४०, कासारसाई ४५०, मुळशी ३२२०, वरसगाव १७६६, पानशेत १७२०, खडकवासला ६८६४, गुंजवणी २५०, नीरा-देवघर ७५०, भाटघर १२३६, वीर ४२००, नाझरे ३२४, उजनी ४१६००..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.