Nanded News: नांदेड जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार शुक्रवारी (ता. २६) दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा जोर शनिवारी सकाळी नऊपर्यंत होता. या काळात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २५ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. मागील चोवीस तासांत सरासरी ५१ मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शनिवारी सकाळी नऊ ते बारापर्यंत काहींसा जोर कमी झालेला पाऊस पुन्हा वाढला आहे. नांदेडला आजपर्यंत सरासरी १०८५ मिलिमीटरनुसार १२१.७३ टक्के पावसाची नोंद झाली आहे..नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिली. जिल्ह्यात शुक्रवारी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा जोर सर्वच तालुक्यांत होता. जिल्ह्यातील २५ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. मागील चोवीस तासांत सरासरी ५१ मिलिमीटर पाऊस झाला. जोरदार पावसामुळे धर्माबाद तालुक्यातील बेलूर पुलावरून पाणी चालू आहे. अर्धापूर तालुक्यातील रोडगी येथे संतोष काकडे यांची एक म्हैस वीज पडून मृत पावली आहे. .Nanded Heavy Rain : नांदेडला सलग तिसऱ्या दिवशी पाच महसूल मंडलांत अतिवृष्टी.भडेगाव येथे पुराच्या पाण्यात झाडावर अडकलेला एक व्यक्ती स्थानिक बचाव पथकाने वाचवला. कंधार तालुक्यातील बहादरपूरा पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग दोन्ही बाजूंनी बंद आहेत. देगलूर तालुक्यात आठ गावांमध्ये पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला आहे. नांदेड तालुक्यातील राहेगाव गावाचा संपर्क तुटला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. .अतिवृष्टी झालेले महसूल मंडले (मिलिमीटरमध्ये) नांदेड शहर ९२.००, तुप्पा ९९.५०, वसरणी ८२.२५, विष्णुपुरी १३२.२५, वाजेगाव ७७.२५, सगरोळी ९५.२५, आदमपूर १०१.७५, रामतीर्थ ९५.२५, मुखेड ६७.२५, जांब १११.७५, येवती ७१.२५, चांडोळा ६७.२५, बार्हाळी १०२.७५, कंधार १२८.५०, कुरूळा १११.७५, उस्माननगर १४८.००, दिग्रस बु. १११.७५, लोहा १४८.००, माळाकोळी १२८.५०, कापशी ९९.५०, सोनखेड १४८.००, कलंबर १४८.००, मुदखेड ७९.५०, मुगट ७९.७५, मांजरम ६७.२५..Nanded Heavy Rain: नांदेडला पुन्हा मुसळधार पाऊस.अतिवृष्टीमुळे बंद असलेले महामार्ग....नांदेड - हैदराबाद महामार्गावरील वाका पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प.बेलूर (धर्माबाद) पुलावर पाणी.शेलगाव (अर्धापूर) पुलावर पाणी आल्याने गावाचा संपर्क तुटलादेगाव येथील पुलावरील मार्ग बंद आहे. .बाऱ्हाळी, मुक्रमाबाद, निवळी पुलावरील रस्ता बंदमुखेडमधील बेरळी मार्ग बंद. उमरा-परसराम तांडा-लाडका मार्गावरील वाहतूक बंदकापसी- हिंदोळा पुलावरील मार्ग बंद. धनंज खुर्दचा संपर्क तुटला. .देऊळगाव, चितळी येथे ओढ्याला पूर आल्याने रस्ता बंद.सोनखेड हद्दीतील निळा, डेरला या गावांचा संपर्क तुटला उमाननगर पोलिस हद्दीत जोशी सांगवी मार्गावरील पुलावर पाणी.डोंगरगाव पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन मंदिरे व पुतळ्याजवळ पाणी पोहोचले.चोंडी येथील बंधारा पाण्याखाली. धानोरा, खांबेगाव पुलावर पाणीकंधार तालुक्यातील बहादरपुरा पुलावरील मार्ग दोन्ही बाजूंनी बंद देगलूर तालुक्यात आठ गावांचा संपर्क तुटलानांदेड तालुक्यातील राहेगाव गावचा संपर्क तुटला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.