Akola News : पश्चिम विदर्भात शनिवारी (ता. २५) झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विशेषतः वेचणीला आलेल्या कापसाला या पावसाचा मोठा फटका बसला असून, सोंगणी केलेले सोयाबीन भिजल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असल्याने तुरीच्या पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. शिवाय बाजारपेठांमध्येही सोयाबीनचे पोते भिजल्याच्या घटना समोर आल्या आहेत..या वर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील पिकांचे आधीच नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली होती. नुकतेच शेतकऱ्यांनी उरलेल्या पिकांची कापणी सुरू केली होती. सोयाबीन सोंगणीला वेग आला असताना झालेल्या या पावसाने मोठा धक्का बसला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अपेक्षेच्या तुलनेत अर्धेच उत्पादन मिळाले असून काही ठिकाणी एकरी केवळ दोन क्विंटलपर्यंतच उत्पादन येत आहे..Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे भाजीपाला उत्पादक संकटात .दुसरीकडे कापसाची वेचणी सुरू असताना अचानक झालेल्या पावसामुळे शेतात कापूस ओला झाला आहे. कापसाचा रंग बदलून दर्जा घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये गेल्या २४ तासांत मेहकर, लोणार, बाळापूर आणि अकोला तालुक्यांत जोरदार पाऊस झाला..Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे ३ लाख हेक्टरवरील पिके बाधित.बाजार समित्यांत दाणादाणशनिवारी (ता. २५) झालेल्या जोरदार पावसामुळे पातूर बाजार समितीत सोयाबीन झाकण्यासाठी एकच धावपळ झाली. बाजारांमध्ये सोयाबीनची आवक वाढत असून शनिवारी या बाजारातही मोठी आवक होती. अचानक पाऊस सुरू झाल्याने सोयाबीन भिजू नये यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली..थंडीऐवजी पाऊसऑक्टोबर महिन्यात थंडीचा मोसम सुरू होण्याऐवजी पावसाचे आगमन झाल्याने रब्बी हंगामही रखडला आहे. हरभरा लागवड अद्याप सार्वत्रिक सुरू झालेली नाही. हवामान विभागाने ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा इशारा दिला असून, पुढील पाच दिवसांतील हवामानस्थितीवर पिकांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. या पावसाने हरभरा लागवडीला तसेच कोरडवाहू पट्ट्यातील कपाशी व इतर पिकांना फायदासुद्धा होऊ शकतो, असा दावा केला जात आहे..जोरदार पाऊस झालेली मंडलेमेहकर - ४८.८ मिमीजानेफळ - २८.८हिवराआश्रम - ३१.३देऊळगावमाळी - ३८नायगाव दत्तापूर - ६६.५बिबी - ७३सुलतानपूर - ९४मलकापूर पांग्रा - ४८.५.नुकतीच कापूस वेचणीला सुरुवात झाली होती आणि पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे कापसाचा दर्जा खालावला. सीसीआयच्या नियमानुसार विक्री करणे कठीण होईल. बोंडांमध्ये पाणी गेल्याने वेचणीस वेळ लागतो. त्यामुळे मजुरी जास्त लागेल.- गणेश नानोटे, कापूस उत्पादक, निंभारा, जि. अकोला.नुकतेच कांदा बियाणे पेरणी झाली आहे. आमच्या भागात तासभर जोरदार पाऊस झाल्याने हे बियाणे बाद होण्याची भीती आहे.- शंकर धोत्रे, शेतकरी, वाडेगाव, जि. अकोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.