Dharashiv News : उमरगा तालुक्यात अतिवृष्टीने शेतजमिनीचे वाटोळे केले आहे. रब्बीतील पेरणीचे दिवस सुरू झालेले असले, तरी अधूनमधून असलेली पावसाची रिपरिप पेरणीसाठी अडचणीची ठरत आहे. दरम्यान, शेतात वाढलेले तण, पाण्याची स्थिती असल्याने रानाला वाफसा येण्यासाठी आणखी बरेच दिवस लागतील. काही मोजक्या ठिकाणच्या जमिनीवर शेतकरी पेरणी करण्याचे धाडस करताहेत. .उमरगा तालुक्यात अतिवृष्टीने खरिपाची पिके पाण्यात अडकल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. शेतजमिनी वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आहे. आता रब्बी हंगामातील पेरणीचे दिवस सुरू झाले आहेत; मात्र अतिवृष्टीने जमिनी पेरणीसाठी तयार व्हायला आणखी बरेच दिवस लागणार असल्याने शेतकऱ्यांना जमिनीच्या दुरुस्तीला वेळ द्यावा लागत आहे. वाढलेले तण काढण्यासाठी मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे..Rabi Sowing : लातूर विभागात पंधरा लाख हेक्टवर रब्बीचा पेरा.हरभरा, उसाचे क्षेत्र वाढणारतालुक्यात रब्बीचे ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यात जवळपास २५ हजार हेक्टरवर हरभरा पेरणी होऊ शकते. किमान पाच हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणीची शक्यता आहे. गव्हाचे क्षेत्रही वाढेल. पाच नोव्हेंबरपर्यंत ज्वारीची पेरणी करणे अपेक्षित असते. मात्र, इतक्या घाईगडबडीत पेरणीसाठी जमीन तयार करणे शक्य नसल्याने यंदा ज्वारीचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबरपर्यंत हरभरा व गव्हाची पेरणी शक्य असल्याने याचे क्षेत्र वाढेल..Rabi Sowing : रब्बी हंगामात ३ लाख ३९ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित.शिवाय यंदा पाण्याची उपलब्धता असल्याने उसाचे क्षेत्रही वाढेल, अशी स्थिती आहे. दरम्यान, चढावर असलेल्या चांगल्या प्रतीच्या शेतजमिनीवर पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करून मोजक्याच क्षेत्रात पेरणी झाली आहे. मात्र, आणखी ९५ टक्के क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे..यंदा अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकाचे नुकसान केले. नुकसानीच्या अगदी २५ टक्केच रक्कम शासनाकडून देऊन बोळवण केली जातेय. आता रब्बी पेरणीसाठी रान तयार होण्यासाठी कष्ट घ्यावे लागत आहेत. त्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने अडथळा येतो आहे.- रवी मुळे, शेतकरी, आष्टा (जहागीर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.