Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागातल्या शेवगाव, पाथर्डी, जामखेड, अहिल्यानगर, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यांत मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. चोवीस तासांत तब्बल ३५ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे सीना, खैरी, ढोरा, नंदिनीसह स्थानिक पातळीवरील नद्यांची पूरस्थिती कायम आहे. पावसामुळे शेतकरी, नागरिक हतबल झाले आहेत. शेवगावातील मंडलांत प्रत्येकी १४८ मिमी तर मुंगी मंडलात १४२ मिमी पावसाची नोंद झाली..अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात आणि शेजारच्या सीमेवरील शिरूर कासार, आष्टी, गेवराई या तालुक्यांत आठ दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. सातत्याने मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडत असल्याने खरीप पिकांची अक्षरशः वाताहात झाली आहे. शेवगाव, पाथर्डी, जामखेड, अहिल्यानगर, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात मोठी हानी सुरू आहे. बहुतांश पिके तर गेली आहेतच, पण नदीकाठच्या शेतीचे, घरांचे, तसेच रस्ते, पूल, विजेचे खांब, नदीकाठच्या विहिरी, पाइपलाइनचे मोठे नुकसान झाले आहे..Ahilyanagar Heavy Rain: अहिल्यानगरला मुसळधार.सोमवारी (ता. २२) रात्री व मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंत दक्षिण भागात पुन्हा जोरदार पाऊस झाला. पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांतील बहुतांश मंडलांत अतिवृष्टी झाली. सीना धरणातून १५ हजार क्युसेकने तर खैरी धरणातून १६ हजार ४१४ क्युसेकने पाणी विसर्ग होत असल्याने दोन्ही नद्यांना पूर आला आहे. जामखेड तालुक्यासह शेजारच्या धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांना या पुराचा फटका बसला आहे.पाथर्डीतील पावसाने शेवगाव तालुक्यातील नंदिनी, ढोरा नदीला पुन्हा पूर आला आहे..शेवगाव तालुक्यातील आधोडीचा तलाव भरला. बोधेगाव, गोळेगाव, नागलवाडी, लाडजळगाव, राणेगाव, शिंगोरी, प्रभुवाडगाव, चापडगाव भागातील पावसाने चापडगाव, बोधेगावच्या काशी नदीला मोठा पूर आला आहे. या भागातील विजेचे खांब पडले असून शेतातील पिकांत पाच फुटांपर्यंत पाणी आहे. रस्ते, पूल वाहून गेले आहेत. पाइपलाइन तुटल्या. अनेक शेतकऱ्यांचे सौरऊर्जेचे संच वाहून गेले. सोमवारी रात्री साडेआकरा ते पहाटे चारपर्यंत जोरदार पाऊस होता. त्यामुळे खूप नुकसान झाले, सौर संच वाहून गेले असे शेतकरी रामेश्वर तांबे व प्रमोद तांबे यांनी सांगितले..Ahilyanagar Rain: जोरदार पावसामुळे मुळा, सीना नदीला पूर.अतिवृष्टीची मंडले (कंसात मिमी पाऊस)अहिल्यानगर ः सावेडी ः ८४, केडगाव ः ७०, वाळकी ः ६९, रुईछत्तीशी ः ६७, नेप्ती ः ७०पारनेर ः भाळवणी ः ७९श्रीगोंदा ः मांडवगण ः ६८कर्जत ः कोंभळी ः ७६, मिरजगाव ः १०१, माही ः ८८, अरणगाव ः ११५.जामखेड ः खर्डा ः ७६, नान्नज ः ८५, नायगाव ः ९४, पाटोदा ः ८५, साकत ः ९४शेवगाव ः शेवगाव ः १३१, भातकुडगाव ः ८३, बोधेगाव ः १४८, चापडगाव ः १४८, ढोकजळगाव ः ८३, एरंडगाव ः ११२, दहिगावेने ः ११२, मुंगी ः १४२पाथर्डी ः पाथर्डी ः ६५, माणिकदौंडी ः ६५, टाकळी ः १३१, कोरडगाव ः १०७, करंजी ः ६६, मिरी ः ७६, तिसगाव ः ७५, खरवंडी ः १३१ अकोले ः १०७नेवासा ः सलाबतपूर ः १५०, कुकाणा ः ८३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.