Dharashiv News : जिल्ह्यात २९ सप्टेंबरनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यातील कळंब तालुक्यात शनिवारी (ता. ४) पुन्हा थैमान घातले. तालुक्यातील सहा महसूल मंडळात मुसळधार पाऊस झाला असून चार मंडळात अतिवृष्टी झाली आहे. वाशीरा आणि मांजरा नदीला पूर येऊन काढणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. .धनेश्वरी बोरगाव येथील चंद्रसेन चोरघडे यांच्यासह दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पाडोळी (ता. कळंब) येथील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन विजयकुमार सत्यनारायण जोशी (वय ५१) यांचा मृत्यू झाला. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह शनिवारी रात्री एकपासून सुरू झालेला पाऊस रविवारी (ता. ५) सकाळी सातपर्यंत कोसळत होता. .मोठ्या प्रमाणात पाऊस मांजरा नदीचे पाणलोट क्षेत्र असलेल्या भागात पडल्याने मांजरा धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे धरणातून रविवारी पहाटे पाचपासून विसर्ग वाढवण्यात आला आहे. पहाटे पाच वाजता सुरू केलेला ३४९४ क्सुसेकचा विसर्ग सकाळी अकरा वाजता वाढवून ३९ हजार ९१४ क्युसेक करण्यात आला होता. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या तडाक्यातून वाचलेल्या सोयाबीनच्या काढणीला वेग दिला होता. .Dharashiv Heacy Rain : धाराशिव जिल्ह्यावर अतिवृष्टीची गर्द छाया ! .यातूनत काढणी करून मळणीसाठी सोयाबीनच्या गंजी लावून ठेवल्या होत्या. पाऊस आला तरी कमी प्रमाणात येईल, असे वाटत असतानाच जिल्ह्यात शनिवारी रात्री पावसाने पुन्हा दणका दिला. रविवारी सकाळी आठपर्यंतच्या मागील चोवीस तासांत सरासरी १७.९ मिलिमीटर पाऊस झाला. यात एकट्या कळंब तालुक्यात ६६.२ मिलिमीटर पाऊस झाला. ईटकर, मोहा, शिराढोण व गोंविदपूर मंडलांत अतिवृष्टी झाली. वालवड (ता. भूम) व वाशी मंडलांत अतिवृष्टी झाली. .धाराशिव तालुक्यात ०.६ मिमी, तुळजापूर ०.४, परंडा ७.३, भूममध्ये २८.३ मिमी तर उमरगा तालुक्यात २.२ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाशीरा नदी, इटकूर भोगजी रोडवरील नदीला महापूर आला होता. त्यामुळे रविवारी सकाळी नऊपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. बाभळगावसह कळंब तालुक्यातील काही गावांत अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले. .संसारोपयोगी साहित्य भिजून खराब झाले असून, नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून अंदोरा ते बाभळगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. ग्रामीण भागाला जोडणारे कोठाळवाडी, भोगजी आणि खामसवा ते मोहा हे रस्ते जलमय झाले आहेत. खामसवाडी शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने शेतात साचलेल्या पाण्यामुळे उभे पीक आडवे पडले आहे. .Dharashiv Rain : तीन दिवसांच्या पावसात सहाशे घरांची पडझड.सोयाबीन व तुरीचे नुकसान झाले आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या नदी काठच्या जमिनी पिकासकट वाहून गेल्या. लातूर जिल्ह्यात शनिवारी रात्री काही भागांत रिमझिम पाऊस झाला. चोवीस तासांत सरासरी ४.८ मिमी पावसाची नोंद झाली..पाडोळीमध्ये शेतकऱ्याचा मृत्यूकळंब तालुक्यातील निपाणी ते पाडोळी ओढ्याच्या पुरात वाहून पाडोळी येथील शेतकरी विजयकुमार सत्यनारायण जोशी (वय ५१) यांचा मृत्यू झाला. ते मुरुड (ता. लातूर) येथे वास्तव्यास असून रविवारी सकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी आणि जनावरांना चारा देण्यासाठी शेतात गेले होते. शेतातून घरी परत येत असताना निपाणी ते पाडोळी ओढ्यावर पाण्याची पातळी वाढली होती. बंधाऱ्यावरून पाणी जोरात वाहत असल्यामुळे पाण्याची खोली व प्रवाहाचा वेगाचा अंदाज न आल्यामुळे प्रवाहाने त्यांना ओढून नेले. वाहत्या पाण्यात त्यांचा मृत्यू झाला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.