Dharashiv News : जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये विशेषतः मागील चार दिवसात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजनुसार जिल्ह्यातील दोन लाख २६ हजार ७०६ हेक्टवरील पिके व फळबागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. एक हजार ४८ घरांची पडझड झाली असून २०७ जनावरे मृत्यमुखी पडली आहेत. जिल्ह्यातील ३६३ गावांसह एक लाख ९८ हजार ३७५ शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने वेगाने हाती घेतले आहेत. .एकाच वेळी पंचनामे व ऑगस्टमधील शासनाकडून मंजूर अनुदानाचे वाटप करण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम गतीने सुरु आहे. पंचनाम्यानंतर भरपाईसाठी तातडीने निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार असून ऑगस्टमधील अनुदानही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली..सप्टेंबर महिन्यात तसेच मागील चार दिवसात अतिवृष्टी तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलन करण्यात येत असून आतापर्यंत दोन लाख दोन हजार ८३९ हेक्टवरील जिरायती, २१ हजार ४४२ हेक्टवरील बागायती व दोन हजार ४२५ हेक्टवरील फळपिकांचे ३३ टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक फटका परंडा तालुक्याला तर सर्वात कमी झळ कळंब तालुक्याला बसली आहे. .परंडा तालुक्यातील ५२ हजार पाचशे शेतकऱ्यांच्या ३७ हजार जिरायत, १९ हजार बागायती तर दोन हजार शंभर फळपिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून २०७ जनावरे मृत्यू पावले आहेत. दुधाळ जनावरांची संख्या मोठी असून त्यात १६५ मोठी तर ३६ लहान जनावरांचा समावेश आहे. .Rain Crop Damage : अस्मानीच्या तडाख्यात शेतकरी संकटात.अन्य सहा जनावरे ओढकाम करणारी आहे. एक हजार ३७ कच्चा घरांची पडझड झाली असून सात घरे संपूर्ण पडली असून चार गोठ्यांनाही अतिवृष्टीची बाधा पोहचली आहे. सार्वजनिक मालमत्तेचीही अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. यात पंधरा तलाव फुटले असून बारा रस्ते व तीन पुलांचे नुकसान झाले आहे..लातूरलाही अतिवृष्टीमुळे मोठे नुकसानलातूर जिल्ह्यातही मागील चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील २८८ गावे अतिवृष्टीमुळे बाधित झाली असून एक लाख ५७ हजार ९५० शेतकऱ्यांना झळ बसली आहे. यात एक लाख १६ हजार ३३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात एक लाख १६ हजार तीस हेक्टरवरील जिरायती, २७० हेक्टरवरील बागायती तर ३० हेक्टरवरील फळपिकांचा समावेश आहे. नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरु असून लवकरच ते पूर्ण होतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी दिली..द्राक्ष, केळी बागा जमीनदोस्तजिल्ह्यात यंदा पाच लाख ७२ हजार २०० हेक्टर क्षेत्रामध्ये खरिपाची पेरणी झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक चार लाख ५९ हजार हेक्टरवर सोयाबीन पीक घेतलेले आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह उडीद, मूग या खरिपातील पिकांचे नुकसान झाले आहे. सध्याही अनेक गावांतील पिके पाण्यामध्ये आहेत. काही ठिकाणी उसाचे फड आडवे झाले असून द्राक्ष, केळीच्या बागांनाही या अतिवृष्टीचा फटका बसला आहे..Rain Crop Damage : सांगलीच्या दुष्काळी तालुक्यांत पावसाचा फटका.भूम महसूल मंडळामध्ये पाच वेळा अतिवृष्टीजिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे दोन लाख २६ हजार ७०६ हेक्टर क्षेत्र बाधितआतापर्यंत ४२ पैकी ३९ महसूल मंडळांत अतिवृष्टी, शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊसजिल्ह्यातील २२६ पैकी ९५ प्रकल्प ओव्हरफ्लो२५२ हेक्टरवरील शेती पाण्याच्या प्रवाहाने खरडून गेलीद्राक्ष, केळी, पेरूच्या बागा उद्ध्वस्त११ मंडळांत चारवेळा, नऊमध्ये तीनवेळा, तर १२ महसूल मंडळांत दोनवेळा अतिवृष्टीघरांचे नुकसानसंपूर्ण पडझड: ७ घरेअंशतः पडझड: १,०३७ कच्ची घरेगोठ्यांचे नुकसान: ४जनावरे मृत: २०७ (१६५ मोठी, ३६ लहान, ६ ओढकाम करणारी जनावरे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.