Amravati News: चांदुर बाजार तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेला मदत निधी अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर लोकविकास संघटनेच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य शेतकऱ्यांनी स्थानिक आमदार प्रवीण तायडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर डफडी बजाव आंदोलन करत शासन व जनप्रतिनिधींचे लक्ष वेधले..जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने मदत जाहीर केली असली तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. केवायसी, आवश्यक कागदपत्रे पूर्ण करूनही आणि वारंवार पाठपुरावा करूनही निधी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. .Heavy Rain Crisis : राज्यात अतिवृष्टीचा कहर.आंदोलनाचे नेतृत्व लोकविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव यांनी केले. ‘‘शेतकरी अडचणीत असताना सरकार डोळेझाक करत आहे. अतिवृष्टीचा निधी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास याहून तीव्र आंदोलन छेडले जाईल,’’ असा इशारा या वेळी देण्यात आला..Nanded Heavy Rain: नांदेड जिल्ह्यात पुन्हा १९ मंडलांमध्ये अतिवृष्टीमुळे दाणादाण .निवडणुकीपुरतेच शेतकऱ्यांचे प्रश्न आठवणीत ठेवले जात असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी शासन व जनप्रतिनिधींविरोधात घोषणाबाजी केली. वेळेत निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी व्यक्त केला. .या आंदोलनात रमन लंगोटे, आकाश खेलदार, ऋषिकेश रडके, संविधान मोहोळ, जावेद पठाण, विजय बाटे, विकास आवारे, सागर सोनारे, प्रवीण तडस, गौरव वैद्य, स्वप्नील रखे, इमरान सौदागर, गौरव उल्हे, शाम पारीसे, सोपान पोहोकार, मदन बुदुडे, अशोकराव बंड यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.