Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांनंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. भंडारदरा धरणातून गुरुवारी (ता. २१) ८९९३ क्युसेकने तर निळवंडेतून ४ हजार ८४१ क्युसेकने विसर्ग केला जात होता. मुळा धरणातही दोन दिवस पाण्याची जोरदार आवक झाल्याने मुळा धरणाचा पाणीसाठा ९२.५३ टक्के झाला असून ९ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. \.गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्व भागांत जोरदार पाऊस सुरू असला तरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातही पाऊस कमीच होता. मात्र मंगळवारपासून या भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. .Pune Heavy Rain: पश्चिम भागात घाटमाथ्यावर पाऊस सुरूच.गेल्या २४ तासांमध्ये घाटघर येथे ९०, रतनवाडी येथे १०३, पांजरे येथे ११९, भंडारदरा येथे ८०, निळवंडे येथे ५३, अकोले येथे २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ९८ टक्के झाला असून भंडारदरा धरणात जोरदार पावसामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. .Nanded Rain Damage : नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत .बुधवारी भंडारदरा धरणातून २० हजार ७६३ क्युसेकने तर गुरुवारी ८९९३ क्युसेकने विसर्ग सुरू होता. भंडारदरा धरणातील पाणी निळवंडे धरणात येत असल्याने निळवंडे धरणातून विसर्ग सुरू आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हरिश्चंद्रगड परिसरात मंगळवारी व बुधवारी रात्री धुवांधार पाऊस कोसळला. त्यामुळे दोन दिवस धरणात पाण्याची जोरदार आवक झाली..लहित खुर्द (कोतूळ) येथील सरिता मापन केंद्रापासून यंदाच्या हंगामातील विक्रमी ३५ हजार १०९ क्युसेकने धरणात नवीन पाण्याची आवक झाली. धरणसाठा झपाट्याने वाढला. मुळा नदीचे उगमस्थान असलेल्या हरिश्चंद्रगड, आंबित, कुमशेत, जानेवाडी, कोतूळ भागातील पावसामुळे पाणी आले. गुरुवारी (ता. २१) मुळा धरणाचा पाणीसाठा ९२.५३ टक्के झाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.