New Delhi News: देशात विविध राज्यांत मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक राज्यांतील नद्यांची पाणीपातळी वाढली असून सखल भागात पाणी शिरले आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, ओडिशा यांसह विविध राज्यांतील अनेक गावांचा संपर्क पावसामुळे तुटला आहे. .पंजाबमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील सोमवारी सतलज आणि बियास या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या नद्यांच्या काठावरील कपुरथला, फिरोजपूर, तरन तारन, गुरुदासपूर आणि फाझिल्का या शहरांना पुराचा फटका बसला आहे. गुरुदासपूरमध्ये पुरामुळे सात गावांचा संपर्क तुटला आहे. या गावांना जलरुग्णवाहिका आणि अन्य अत्यावश्यक मदत साहित्य पाठविण्यात आले, असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली..Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी .राज्यातील पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जलद प्रतिसाद दलाच्या ४३८ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, ३२३ वैद्यकीय पथके आणि १७२ रुग्णवाहिकादेखील विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग यांनी दिली. त्याचप्रमाणे पंजाबमधील विविध जिल्ह्यांतील विविध रुग्णालयांत दोन हजार खाटा तयार ठेवण्यात आल्या असल्याचेही राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. तरनतारन, फिरोझपूर आणि फाझिल्का या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे..हिमाचल प्रदेशातील विविध ठिकाणी सोमवारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, यामुळे राज्यातील तीन राष्ट्रीय महामार्गांसह ४०० रस्ते वाहतूक बंद ठेवण्यात आले आहेत. आॅट लार्जी आणि सायंज मार्गावर झालेल्या भूस्खलनामुळे कुलू जिल्ह्यातील १५ गावांचा संपर्क तुटला आहे..Heavy Rain: महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाउस; मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन .राज्यातील विविध ठिकाणी आॅगस्ट २४ पर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील ८८३ रोहित्र आणि १२२ पाणीपुरवठा केंद्रांना पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण दोन हजार १७२ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले..ओडिशामध्ये सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने राज्यातील मलकनगिरी, नवरंगपूर,गजपती आणि कोरापुट या शहरांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. मलकनगिरीमधील सखल भागात पुराचे पाणी शिरले असून अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने अनेक मार्गावर वाहतूक कोंडी झाली असून, अनेक प्रवासी रस्त्यातच अडकून पडले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.