Nashik News : दोन-तीन दिवसांपासून बागलाण व देवळा तालुक्यांतील ग्रामीण भागात पाऊस रोजच हजेरी लावत असल्याने उन्हाळ कांद्यासाठी टाकलेल्या कांदा बियाण्यांच्या (उळे) उगवणक्षमतेवर परिणाम झाला आहे..शनिवारी (ता. २५) बागलाण तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. देवळा तालुक्यात ‘महागाचे बियाणे पाण्यात’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. येथील कसमादे भागात रब्बी हंगामात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. .Unseasonal Rain : अवकाळीने नाशिकच्या पश्चिम भागाला झोडपले.त्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात कांदा उत्पादक शेतकरी कांदा बियाणेची पेरणी करत रोप तयार करतात. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी कांद्यांसाठी शेते मोकळी ठेवत कांदा बियाणेची पेरणी केली मात्र पावसाची रोजच जोरदार हजेरी लागत असल्याने या उळेच्या उगवणक्षमतेवर परिणाम झाला आहे. .Unseasonal Rain : दिवाळीच्या सणावर संकटाचे ढग.तर काहींचे बुरशी वाढत सडू लागले आहे. कांदा रोप तयार करतेवेळी प्रमाणात पाणी असणे गरजेचे असते. आधीच दहा ते बारा हजार रुपये पायलीचे महागाचे उळे खरेदी करत ते शेतात टाकले आहे. परंतु पावसाने त्याची लय बिघडवून टाकल्याने नवीन उळे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे..एकीकडे कांद्याला भाव नाही त्यात पावसामुळे उळे खराब होऊ लागल्याने शेतकऱ्याची अवस्था अवघड झाली आहे. कांदा हे नगदी पीक असून, या भागातील शेतकऱ्यांचे ते हक्काचे पीक असते; परंतु यंदा कांद्याच्या भावाने व अवकाळी पावसाने कांद्याचे गणित बिघडविले आहे..- कुबेर जाधव, शेती अभ्यासक, विठेवाडी, ता. देवळा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.