Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसांत झालेल्या पावसाने मका पिकाचे अतोनात नुकसान केले आहे. सोंगणी केलेले मक्याचे पीक भिजले असून अनेक ठिकाणी कणसातून कोंब बाहेर येऊ लागले आहेत. बुलडाणा, मोताळा या मका उत्पादक तालुक्यांत पावसाने तडाखा दिल्याने नुकसान झाले आहे. शनिवार (ता. १) आणि रविवारी (ता. २) या भागात जोरदार पाऊस पडला. काही मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली होती..रविवारी मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे परिसराला जोरदार पावसाने झोडपले. जवळपास पाच तास मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे मका, सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे..Maize Crop Damage : कणसे पडताना वाळतोय मका.धामणगाव बढे, पिंपळगाव देवी, कोल्ही गवळी, आव्हा, उऱ्हा, लिहा, रिधोरा खंडोपंत, वडगाव, किन्होळा, ब्रह्मंदा, खांडवा, निपाणा, सिंदखेड, कोऱ्हाळा, खेडी, पान्हेरा शिवारासह परिसरात रविवारी पहाटे तीन वाजेपासून पाऊस सुरू झाला होता. जवळपास पाच तास पावसाचा तांडव सुरू होते..अनेक ठिकाणी शेतशिवारात पाण्याच्या पाण्याचा तलाव तयार झाला होता. शेतकऱ्यांनी मका, सोयाबीनची कापणी करून शेतात सुड्या लावून ठेवल्या होत्या. मात्र पावसामुळे या सुड्या पाण्याखाली गेल्या आहेत. काही ठिकाणी शेतातील सुड्या पाण्यात वाहून गेल्याचे सांगितले जाते. .Maize Crop Protection: अतिवृष्टीनंतर मका पिकावर येणारे कीड आणि रोग कोणते; त्यांचे नियंत्रण कसे करावे? .अशाच प्रकारचे नुकसान बुलडाणा तालुक्यात धाड परिसरात झाले. म्हसला मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. ९८ मिलिमीटर पाऊस पडला. हा भाग प्रामुख्याने मका उत्पादनात अग्रेसर मानला जातो. मक्याचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येणार असतानाच ही आपत्ती ओढवली. नुकसानाची माहिती मिळताच या भागाचे आमदार संजय गायकवाड यांनी बांधावर जात शेतकऱ्यांचे सांत्वन केले. अॅड. शर्वरी तुपकर यांनीही मोताळ्यात ठिकठिकाणी भेटी दिल्या. .केंद्रीय राज्यमंत्र्यांचे पंचनाम्यांचे निर्देशदोन दिवसातील नुकसानीची माहिती घेत केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील यंत्रणांना तातडीने पंचनामे करून अहवाल देण्याबाबत निर्देश दिले. पाऊस नुकसानाची त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.