Amaravati News : यंदाच्या खरीप हंगामात जुलै व ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह फळबागांचे नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, कृषी विभाग व जिल्हा परिषदेने केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील ५१ हजार ७१९ हेक्टर क्षेत्राला फटका बसला. जिल्हा प्रशासनाने शासनाकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी ४७.४५ कोटी रुपयांची मागणी नोंदविली आहे..जुलै व ऑगस्टमध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने काही महसूल मंडळांतील खरिपाची पिके उद्ध्वस्त झालीत. दर्यापूर तालुक्यात सर्वाधिक १२ हजार ४५४ हेक्टर क्षेत्राला फटका बसला तर त्याखालोखाल धामणगावरेल्वे १० हजार ३८४, नांदगाव खंडेश्वर ९५०५ व मोर्शी तालुक्यातील आठ हजार ९४८ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली..यंदा सोयाबीनचे पेरणीक्षेत्र कमी असले तरी या अतिवृष्टीने २५ हजार ५३५ हेक्टरमधील हे पीक नष्ट झाले आहे. १८ हजार २४७ हेक्टरमधील कापूस व पाच हजार १५ हेक्टरमधील तुरीला चांगलाच फटका बसला आहे..Rain Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान; पंचनाम्यासाठी पाणी ओसरण्याची प्रतीक्षा.प्रशासनाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील ५१ हजार ७१९ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान जिरायती शेतीचे झाले आहे. .Rain Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यातील बावीस मंडलांत अतिवृष्टी.तब्बल ४९ हजार २१२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून २५ हेक्टरमधील बागायती व २४८१ हेक्टरमधील फळबागांना तडाखा बसला आहे. या नुकसानीचा फटका ७२ हजार ३१६ शेतकऱ्यांना बसला असून प्रशासनाने नुकसानभरपाईसाठी ४७.४५ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविली आहे..पीकनिहाय बाधित क्षेत्र (हेक्टर)सोयाबीन ः २५,५३५, कापूस ः १८,२४७, मूग ः ६२, उडीद ः १.३४, धान ः २.९५, मका ः १५० ः एकूण ः ४९,२१२बागायती पिकांचे क्षेत्र ः भाजीपाला-फुले ः १८.७०फळपीक ः संत्रा ः २४८१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.