Maharashtra Rain Alert: पुणे जिल्ह्यात रविवारी (ता. ५) सकाळी आठ ते सोमवारी (ता. ६) सकाळी आठ या २४ तासांत मुसळधार पावसाची नोंद झाली. मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथे सर्वाधिक २५० मिलिमीटर, ताकवे बुद्रुक येथे २२४ मिलिमीटर, तर चिंचवड येथे २०६.५ मिलिमीटर पाऊस झाला. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढला असून काही धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. .या पावसामुळे पेरणीच्या कामांना गती मिळणार आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा धरण सोमवारी (ता. ६) पहाटे शंभर टक्के भरले असून अनियंत्रित सांडव्यातून इंद्रायणी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच वडीवळे धरण परिसरात सकाळी सहा वाजेपर्यंत १९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी आठ वाजता २१७२ क्युसेकने सुरू केलेला विसर्ग सकाळी नऊ वाजता ४१३९ क्युसेक, तर दुपारी एक वाजता ८९३५ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला..Heavy Rain Pune : पुणे जिल्ह्यात पंधरा मंडलांत अतिवृष्टी.कासारसाई धरणाची पातळीही झपाट्याने वाढली. सकाळी ११.३० वाजता धरण ७५.६५ टक्के भरले होते. अवघ्या अडीच तासांत दुपारी दोन वाजता पाणीसाठा ९३.४५ टक्क्यांवर पोहोचल्याने धरणाच्या सांडव्यातून ३८६० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. जाधववाडी लघू पाटबंधारे तलाव पूर्ण भरल्याने सुधा नदीमार्गे इंद्रायणी नदीपात्रात अनियंत्रित विसर्ग होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे देहू, आळंदी ते तुळापूर परिसरातील नागरिकांसह पायी दिंडी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे..Pune Monsoon Rain: पुणे जिल्ह्यात विविध भागांत मॉन्सूनचे दमदार पुनरागमन.मळवंडी ठुले लघू पाटबंधारे तलावही पूर्ण क्षमतेने भरल्याने कोथुर्णे ओढ्यात अनियंत्रित विसर्ग सुरू झाला आहे. कोथुर्णे, ब्राह्मणोली, वारू आणि काले परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खडकवासला धरण सध्या ३२ टक्के भरले असले तरी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुढील २४ तासांत धरण ८० टक्के किंवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे..सोमवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील प्रमुख पावसाची नोंद (मिलिमीटर)वडगाव मावळ २५०, ताकवे बु. २२४, चिंचवड २०६, कुडे १७४, भोर १७२, वाडा १४२, भोसरी, करंजविहिरे १३३, पाषाण ११३, डुडुळगाव ११०, शिवाजीनगर १०८, माले, पिरंगुट १०३, कासारआंबोली, सावरगाव, कोळवण १०२, वेल्हा, पाणशेत, विंझर १००, थेरगाव, निमगिरी ९९, एनडीए ९८, हवेली, राजगुरुनगर ९५, कडूस ९४, दापोडी ९३, किकवी, आंबवडे ९०, घोडेगाव ८९, माळीण, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, राजूर, डिंगोरे, आपटाळे ८३, कळस ७७, खेड, शिरूर ७४, कोथरूड, खडकवासला, थेऊर, उरुळीकांचन ७०, मंचर, तळेगाव, पारगाव ६५, हडपसर, वाघोली ६३, पाबळ ६१, बोरीभडक ६०, भोलावडे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.