Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही सोमवारी (ता. १५) जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मुळा आणि सीना धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने पाणी विसर्गामुळे नद्यांना पूर आला आहे. .तिसऱ्या दिवशी पारनेर पाथर्डी आणि श्रीरामपूर तालुक्यातील दहा महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. पाथर्डी, शेवगाव, पारनेर, कर्जत, श्रीगोंदा या भागांमध्ये गेले दोन दिवस सतत अतिवृष्टी झाली..Ahilyanagar Pre Monsoon Rains : मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.सोमवारी तिसऱ्या दिवशीही दहा महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. या पावसामुळे कापूस, बाजरी, कांदा, सोयाबीन, भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, करंजी शेवगाव तालुक्यांतील बोधेगाव, पारनेर धील पळशी, वाडेगव्हाण श्रीगोंद्यातील बहुतांश भागांमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे..पारनेर भागातील पावसाचे पाणी मूळ धरणात आल्याने मुळा धरणातून विसर्ग वाढवला आहे. मंगळवारी (ता. १६) सकाळी मुळा धरणातून ७ हजार क्युसेकने तर बिना धरणातून पाच हजार क्युसेक विसर्ग सुरू होता त्यामुळे दोन्ही नद्यांना पूर आला..Heavy Rain Ahilyanagar : तीन दिवसांपासून अहिल्यानगरला जोरदार पाऊस.पाथर्डी तालुक्यातील झालेल्या पावसामुळे शेवगाव तालुक्यातील ढोरा, तसेच तिसगाव च्या नदीही दुथडी भरून वाहत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंगळवारी ही दिवसभर ढगाळ वातावरण होते तर काही भागात पावसाच्या सरी झाल्या. दरम्यान, तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पीक नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने सुरू केले आहेत. .अतिवृष्टी झालेली महसूल मंडले (पाऊस मिलिमीटरमध्ये) टाकळी : ६६ पळशी: ७३, पाथर्डी : ८३ माणिकदौंडी : ८३, टाकळी : ७२ खरवंडी: ७२, श्रीरामपूर ६८ बेलापूर ६५, टाकळीभान ७१, कोरेगाव : ७१, .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.