Pune News: भोर तालुक्यातील भाटघर व नीरा देवघर धरण पाणलोट क्षेत्रात यावर्षी दमदार पाऊस झाल्याने दोन्ही धरणे ऑगस्टमध्येच भरली होती. भाटघर धरणाची २३.७४ टीएमसी साठवण क्षमता आहे. या धरणात ८८.९२ टक्के तर ११.९१ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या नीरा देवघर धरणात ९६.५६ टक्के असा मुबलक पाणीसाठा सोमवारी (ता.१३) सकाळपर्यंत उपलब्ध होता. .मुबलक पाणी साठ्यामुळे भोरसह पूर्वेकडील भागाची शेती बहरण्यास मदत होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.भाटघर धरणात २९ डिसेंबरला ९८.२३ टक्के तर नीरा देवघर मध्ये ९८.०० टक्के पाणी साठा होता. त्यातील भाटघर धरणातून २९ डिसेंबरपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसात १० टक्के पाणी साठी कमी झाला आहे. तर नीरा देवघर धरणातून अद्याप विसर्ग सुरू केला नसल्याने जास्तीचा पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी १३ जानेवारीला भाटघर धरणात ८३.७६ टक्के तर नीरा देवघर धरणात ८१.९३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता..Bhatghar Dam : टंचाईमुळे भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद.मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाटघर धरणात ५ टक्के व नीरा देवघर धरणात जवळपास १५ टक्के अधिकचा पाणीसाठा शिल्लक आहे. जानेवारी महिना निम्मा संपत आला तरी दोन्ही धरणातील उपलब्ध पाणीसाठा मागील काहीवर्षांच्या तुलनेत जास्त असल्याने यंदा तालुक्यासह पूर्वेकडील गावांतील नागरिकांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही असे शिल्लक पाणी साठ्याच्या आकडेवारी वरून दिसून येतेय. या वर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली होती. दोन्ही धरणातील पाण्याचा भोर,बारामती, इंदापूर, पुरंदर, फलटण, खंडाळा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्यांसाठी उपयोग होत असतो..Bhatghar Dam : जोगवडी येथे भाटघर धरणक्षेत्रात अतिक्रमण.लाभक्षेत्रनीरा उजवा कालवालांबी - १६९ किलोमीटरतालुके - खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोलाएकूण लागवडीलायक क्षेत्र - १ लाख ३० हजार ०२७ हेक्टरएकूण सिंचन क्षेत्र - ६५ हजार ५०६ हेक्टर.नीरा डावा कालवालांबी - १५२ किलोमीटरतालुके - पुरंदर, बारामती, इंदापूरएकूण लागवडीलायक क्षेत्र - ६८ हजार ७६७ हेक्टरएकूण सिंचन क्षेत्र - ३७ हजार ०७० हेक्टर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.