Vidarbha Rains: पश्चिम विदर्भात कुठे दमदार, तर कुठे पावसाची उघडीप
Maharashtra Monsoon: पश्चिम विदर्भात पावसाने ठिकठिकाणी जोरदार हजेरी लावली असून वाशीम जिल्ह्यात मालेगाव मंडलात अवघ्या चार तासांत तब्बल १०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, अकोला व बुलडाणा जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला असला तरी काही भागात उघाड पडल्याचे चित्र आहे.