Heavy Rain affects Nashik: नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, २० महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर, त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक ३२४.२५ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली. पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते व लहान पूल पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळित झाले आहे..अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांतील अंगणवाड्या तसेच पहिली ते सातवीपर्यंतच्या अनिवासी शाळा बुधवारी (ता.८) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत..त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने ओढे-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क काही काळ विस्कळित झाला. जिल्ह्यावर ढगफुटीसदृश पावसाचे संकट टळले असले, तरी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांत दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. दरम्यान, बुधवारपासून (ता. ८) पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनाने या पाच तालुक्यांतील निर्बंध मागे घेतले आहेत..Monsoon Rain : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज.इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे भामा धरण परिसरात दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली. नद्यांना पूर आल्याने बारापेक्षा अधिक आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने दारणा, वैतरणा, वाकी आणि भामा नद्यांना पूर आला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी धरणांतील पाणीसाठा १४ हजार ८३५ दलघफू होता. तो वाढून बुधवारी २४ हजार ७७१ दलघफू झाला असून, सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली आहे..Rain Andaj : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; मध्य महाराष्ट्र, विदर्भातही पावसाचा अंदाज.नांदूर मधमेश्वरमधून गोदावरीत १५,२४८ क्युसेक विसर्गजिल्ह्याच्या अन्य तालुक्यांत बुधवारी दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, सहा धरणांतून नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..दरम्यान, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात १५,२४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रातील साहित्य व जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने केले आहे..महसूल मंडलनिहाय पाऊस (मिमी)त्र्यंबकेश्वर ३२४.२५वेळुंजे २७५.४०ठाणापाडा २४४.७५हरसूल २२५.७५ओझर १०९.००नाशिक-पाथर्डी ९९.००देवळाली ९४.२५देवपूर, पांगरी बुद्रुक ७५.२५वाडीवऱ्हे, नांदगाव, टाकेद ७१.५०.सातपूर, गिरणारे ६९.७५कळवण ६६.७५चांदोरी ६६.५०माडसांगवी ६६.५०जोगमोडी ६५.५०अभोणा ६५.२५धरणांमधील विसर्ग (ता. ८)गौतमी गोदावरी १,२८० क्युसेकचणकापूर ४,७३२ क्युसेक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.