Jalna News : शहरासह जिल्हाभरात पावसाचे थैमान सुरूच आहे. शनिवारी (ता. २८) मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला असून पिके वाहून गेली आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील २६ मंडळांत अतिवृष्टी झाली असून भोकरदन मंडळात सर्वाधिक म्हणजे १६५ मिमी पावसाची नोंद झाली असून आठही मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, गोदाकाठच्या नागरिकांनी पुराच्या भीतीने शनिवारी, रविवारची रात्रही जागून काढली. .पावसामुळे १२ जनावरे दगावली, तर ४ घरे व एका गोठ्याची पडझड झाली आहे. भोकरदन आणि घनसावंगी तालुक्यातील सर्वच मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. भोकरदन, सिपोरा अंभोरा, अन्वा, रेणुकाई पिंपळगाव, हसनाबाद, दाभाडी आणि माहोरा मंडळांत ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. दरम्यान, गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. .Sangli Rainfall : सांगलीत जोर मंदावला.दरम्यान, रविवारी (ता. २८) शहरात दिवसभर पावसाने उघडीप दिली. मात्र, पावसाचे वातावरण कायम होते. तसेच, जायकवाडी धरणातून वाढविण्यात आलेला विसर्ग आणि सतत होणाऱ्या पावसामुळे गोदावरीला जोडणाऱ्या उपनद्यानांही पूर आला आहे. त्यामुळे धरणाखालील आणि नदीकाठावरील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..कपाशी, सोयाबीनलाकोंब फुटण्याची भीतीजालना तालुक्यातील सोमनाथ परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांमध्ये पाणी साचल्याने पिके सडली आहेत. दरम्यान, काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्याने पुढील काही दिवसांत सोयाबीनला शेतातच कोंब फुटण्याची भीती येथील शेतकरी अजय शिंदे यांनी व्यक्त केली आहे..Ahilyanagar Rainfall : अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसाचा धुमाकूळ.३८ गावे बाधितजालना : गोदावरी नदीपात्रात जायकवाडी प्रकल्प आणि विविध बंधाऱ्यातून सुमारे ३ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील ३८ गावांना पुराचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून डोमलगाव, गांधारी, गंगा चिंचोली, कोठाळा, शिवणगाव, गुंज बुद्रुक, बाणेगाव, गोळेगाव, गंगाकिनारा आदी गावातून नागरिकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आले आहे..या गावांतील नागरिकांचे केले स्थलांतरअंबड तालुका : वाळकेश्वर, गंगा चिंचोली, कोठाळा, बोरी, गंधारी, शहागड, डोमलगाव.घनसावंगी तालुका : जोगला देवी, रामसवाडी, शेवता, बानेगाव, मंगरूळ, पांढरे वस्ती, काळुंका माता वाडी, गुंज बुद्रुक, अंतरवाली टेंभी, शिवणगाव.परतूर तालुका : सावंगी गंगा किनारा, सावरगाव (आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालय येथे स्थलांतर)परतूर तालुक्यातील सुरक्षितस्थळी हलविलेली अंदाजित लोकसंख्यागोळेगाव - २५००सावंगी गंगा किनारा - २१००चांगतपुरी - २०००सावरगाव बु - १७०० .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.