Akola News : अकोला जिल्ह्यात गुरुवारी (ता. २८) दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक भागांत मुसळधार आणि अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाल्याने शेतशिवार जलमय झाले होते. तर घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचे मोठे नुकसानही झाले. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची माहिती समोर येत आहे..गुरुवारी दुपारी अचानक काळे ढग दाटून आले आणि काही मिनिटांतच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही भागांत ढगफुटीची परिस्थिती निर्माण झाली. प्रामुख्याने अकोला, मूर्तिजापूर, तेल्हारा तालुक्यांतील मंडलांत पावसाने अक्षरशः धुवाधार तांडव घातले..Nanded Heavy Rain: नांदेडला पुन्हा मुसळधार पाऊस.जिल्ह्यातील अनेक मंडलांत जोरदार पावसाची नोंद झाली. शेलू येथे सर्वाधिक ७४.५ मिमी पाऊस झाला. लाखपुरी येथे ६८.५, पळसो बढे येथे ६६.८, अकोला ६५.८, उगवा ५८.८, आगर ५८.८, शिवणी ४९, कौलखेड ४९, मूर्तीजापूर ४४.५, हदगाव ४४.५, कुरुम ५१.५, जामठी ५२, अडगाव ५२.५, हिवरखेड ५२.५ मिमी इतकी नोंद झाली. इतरही सर्वच मंडलांत पावसाने जोरदार उपस्थिती लावली..या मुसळधार पावसामुळे शेतशिवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. विशेषतः सखल भागातील शेतशिवार तलावसदृश्य दिसू लागली. कपाशी, सोयाबीन, तूर यासारखी खरीप पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार असल्याची भीती आहे. काही ठिकाणी पिके दिसत नव्हती इतके पाणी साठले होते..Marathwada Heavy Rain: मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान.ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये घुसले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली. वीजपुरवठा तासन्तास खंडित झाल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. .अचानक झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लहानमोठ्या नाल्यांना पूर आला. नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी शेतांमधील पिके खरडून गेली आहेत..या हंगामात आमच्या भागात सलग जोरदार पाऊस झाला. काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी होऊन शेतीशिवार सावरत नाही तोच गुरुवारी पुन्हा जोरदार पाऊस झाला. शेतांमध्ये सर्वत्र पाणी साचले होते. पिके दिसेनासी झाली होती. वारंवार येणाऱ्या आपत्तीने शेतकरी त्रस्त झाला आहे. शासनकर्त्यांनी अद्यापही त्याची गंभीर दखल घेतलेली नाही, हे दुर्दैवी आहे.- राजू वानखडे, प्रगतिशील शेतकरी, जांभा, ता. मूर्तीजापूर, जि. अकोला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.