Solapur News : जिल्ह्यातील ११० पैकी ४३ महसूल मंडलात अतिवृष्टी झाली आहे. याशिवाय नदी, मोठे ओढे, पाझर तलाव, बंधारे यातून सोडल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी थांबले. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. पंचनामे वेळेत पूर्ण करावेत, यासाठी सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली..सांगोला तालुक्यात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. या तालुक्यातील कडलास येथील तलाव फुटल्याने नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाला आज सकाळी मिळाली. या नुकसानीचेही पंचनामे करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले..जिल्ह्यातील ज्या ज्या भागात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाले आहे, त्याचा सविस्तर अहवाल सादर केला जाणार असल्याने जास्तीत जास्त बाधितांना नुकसानीची भरपाई कशी मिळेल?, या दृष्टीने पंचनामे करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आपण स्वत: व पालकमंत्री जयकुमार यांनी केली असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले..पंचनामे अंतिम टप्प्यातसोलापूर शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले व मालमत्तेचे नुकसान झाले. पुरामुळे सोलापूर शहरातील आठ झोनमधील २ हजार ७२३ कुटुंब बाधित झाल्याचे समोर आले होते. उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने युद्ध पातळीवर पंचनामे केले जात आहेत. आतापर्यंत पाच झोनमधील २ हजार ५०३ कुटुंबांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामेही लवकरच पूर्ण होतील, अशी माहितीही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली..Crop Damage Compensation : ऑगस्टमधील भरपाईसाठी १८९ कोटींची मागणी.सीना नदीतील पाणी येऊ लागले नियंत्रणातवडकबाळ (ता.दक्षिण सोलापूर) येथे १८ सप्टेंबरला सीना नदीतील पाण्याने इशारा व धोका पातळी ओलांडली होती. या ठिकाणी नदीची इशारा पातळी ४२६.५०० मीटर तर धोका पातळी : ४२७.५०० मीटर एवढी आहे. १८ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता ४२८.१२० मीटर एवढी पातळी होती. आता नदीतील पाणी आटोक्यात येत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली..Flood Crop Damage : सोलापूर जिल्ह्यातील पिके भुईसपाट; घरे, वाड्या-वस्त्या, गोठ्यांमध्ये चिखल.पंचनामे नाहीत, कर्मचाऱ्यांवर रोषजिल्ह्यातील ११० पैकी ४३ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्याठिकाणी सरसकट पंचनामे करण्यात येणार आहेत, पण ज्या मंडळात अतिवृष्टी झाली नाही पण पावसाने खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा ठिकाणी पंचनामे करण्याबाबत संभ्रम आहे. शासनाने दिलेल्या निकषानुसारच पंचनामे करण्यात येत असल्याचे पथकातील कर्मचारी सांगत आहेत. .प्रत्यक्षात पंचनामे करणाऱ्या पथकास शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. लोकप्रतिनिधींनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असतानाही पंचनामे का केले जात नाहीत असा प्रश्न शेतकरी महसूल, कृषी कर्मचाऱ्यांना उपस्थित करत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.