Solapur News : अतिवृष्टी व महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील ४ लाख ३९ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या ४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ६० टक्के बाधित क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे झाले असून, कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ८३७ गावांमधील शेतीचे नुकसान झाल्याची माहिती राज्य शासनाला कळवली आहे. .दरम्यान, सीना नदीची पूरस्थिती निवळली असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सीना नदीच्या महापुरामुळे जिल्ह्यातील मोहोळ, माढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे..Kharif Onion Crops Damage : अतिवृष्टीचा खरीप, लेट खरीप कांद्याला फटका, ८० टक्के पिकाचे नुकसान.जिल्ह्यातील २ लाख ५१ हजार २५६ हेक्टरवरील जिरायती क्षेत्राचे तर एक लाख ८ हजार ८८ हेक्टर बागायती आणि ३८ हजार ८९० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्यात तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, मका, ऊस, भाजीपाला, कांदा, पेरू, केळी, झेंडू, बाजरी, कडवळ, टोमॅटो, काकडी, भुईमूग अशा पिकांचे समावेश आहे..विशेषतः अप्पर मंद्रूप, अक्कलकोट, मोहोळ, उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, सांगोला या तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजात नमूद केले आहे. दरम्यान, नुकसान झालेले क्षेत्र वाढू शकते, असे कृषी विभागाचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले..Crop Damage : अकोल्यात अतिवृष्टीमुळे २९ हजार हेक्टरवर नुकसान.तालुकानिहाय बाधित गावे आणि कंसात शेतकरी संख्या याप्रमाणेदक्षिण सोलापूर-२८ (१८,५००), मंद्रूप अप्पर-११ (४०००), उत्तर सोलापूर-१६ (२३,१९१), बार्शी-१३८ (८८,२७३), अक्कलकोट-११८ (४३,४९२), मोहोळ-४७ (४०,२७३), माढा -१०७ (८६,८१४), करमाळा-१०२ (५१,३०५), पंढरपूर-४६ (११,२८८), सांगोला-५५ (२१,४५३), माळशिरस-८८ (२२,५६७), मंगळवेढा-८१ (२७,१२७)-एकूण गावे-८३७ (४,३९,०३२)..प्राथमिक अंदाजानुसार ३ लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पूर थांबल्याने पंचनाम्यालाही वेग आला आहे. आतापर्यंत अंदाजे ६० टक्क्यांपर्यंतचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाला अहवाल पाठवला जाईल.--शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.