Nashik Agriculture: ऑक्टोबरमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले असून वाफसा न झाल्याने रब्बी पेरणी मोठ्या प्रमाणात उशिरा सुरू झाली आहे. सध्या सरासरीच्या अवघ्या १० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली असून, काही तालुक्यांमध्ये कामांना गती मिळू लागली आहे.