Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाने उसंत दिली आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातही पावसाचा जोर कमी आहे. धरणे काठोकाठ भरलेली असल्याने आता धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक पाहून धरणांतून विसर्ग कमी-जास्त केला जात आहे. सध्या निळवंडे, भंडारदरा, मुळा धरणांतून विसर्ग सुरू आहे. .जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे, भोजापूरसह सर्वच धरणे भरलेली आहेत. चार दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाल्याने धरणातून विसर्ग सुरू केला होता. हा विसर्ग सध्याही सुरू आहे. सोमवारी (ता. २५) भंडारदरा धरणातून २७४४ क्युसेक, निळवंडे धरणातून ६,३९२ क्युसेकने विसर्ग सुरू असून हे पाणी येत असलेल्या ओझर बंधाऱ्यातून ४४३१ क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू आहे..Sangli Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत ७३ टक्के पाणीसाठा.हे पाणी जायकवाडी धरणाकडे जात आहे. तीन दिवसांपासून मुळा धरणातून १५०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. मुळा धरणात कोतूळजवळ ३८२२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. पारनेर भागातून येणाऱ्या कुकडी नदीतून २५०० क्युसेकने विसर्ग सुरू असून भीमा नदी सिद्धटेकजवळ १४ हजार ९६२ क्युसेकने वाहत आहे. .अकोल्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांत घाटघरला ३५ मिलिमीटर, रतनवाडीला २७ मिलिमीटर, पांजरे येथे ३२ मिलिमीटर, भंडारदरा येथे २८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अन्य भागात मात्र पाऊस नाही. सध्या भंडारदरा धरणात ९९.४१ टक्के, निळवंडे धरणात ९९.०४ टक्के, मुळा धरणात ९७.८६ टक्के, पाणीसाठा स्थिर आहे, असे सांगण्यात आले..Akola Water Storage : अकोल्यातील सर्वच प्रकल्प तुडुंब.साताऱ्यातील सहा धरणांतून विसर्ग सुरूचसातारा ः जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी प्रमुख धरणांत पाण्याची आवक होत आहे. पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी सहा प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. यामध्ये कोयना धरणातून १०,४०० क्युसेक, धोम १०६८, कण्हेर १३२५, उरमोडी १३००, तारळी १६८०, वीर ६६८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात केला जात आहे. .यामुळे नद्यांची पाणीपातळी टिकून आहे. या अगोदर विसर्गात वाढ केल्याने अनेक पूल व कृषिपंप पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे. सर्वच धरणात ९५ टक्केवर पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण ९५.५७ टक्के, धोम ९७.४३, धोम-बलकवडी ९७.७३, कण्हेर ९७.७१, उरमोडी ९८.१३, तारळी ९६.३४ टक्के भरली आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.