Jalgaon News : खानदेशात ऑगस्टमध्ये अनेक तालुके, महसूल मंडलांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात काही तालुके, भागांत १०० टक्क्यांवर पाऊस झाल्याची नोंद दिसत आहे. खानदेशात जूनमध्ये जळगाव व धुळे जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली होती. जळगाव जिल्ह्यात १२४ मिलिमीटर एकूण पाऊस जूनमध्ये झाला होता. .जूनमध्ये नंदुरबारात आठ टक्के कमी पाऊस होता. त्यानंतर जुलैत जळगाव, धुळे व नंदुरबारात पावसाची तूट २० टक्क्यांवर होती. ऑगस्टचे दोन आठवडेदेखील पाऊसमान कमी होते. पण ऑगस्टच्या मध्यानंतर अनेक भागात पाऊस सुरू झाला. पोळा सणापूर्वी सर्वत्र पावसाने हजेरी लावली. यामुळे पाऊसमान सुधारले..Pune Rainfall: मावळात सर्वाधिक २०९ टक्के पाऊस.जळगाव जिल्ह्यात एकूण ६३२ मिलिमीटर पाऊस जून ते सप्टेंबरअखेरिस पडतो. धुळ्यात सुमारे ५६४ व नंदुरबारात ८५४ मिलिमीटर एकूण पाऊस पडतो. जळगाव जिल्ह्यात ऑगस्टअखेर ५०९ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. पण ऑगस्टअखेर जिल्ह्यात ४६८ मिलिमीटर एकूण पाऊस झाला आहे. .ऑगस्टमधील जोरदार पावसात जळगाव जिल्ह्यात एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. नंदुरबारातही अक्कलकुवा, नवापूर भागात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. धुळ्यातील साक्री तालुक्यातही चांगले पाऊसमान आहे. या भागातील काही महसूल मंडलांत जुलै व ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, धरणगाव व यावल तालुक्यांत कमी पाऊसमान आहे. .Maharashtra Rainfall: ऑगस्टअखेर पावसाने सरासरी ओलांडली.धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारातील शहादा भागातही कमी पाऊसमान यंदा राहीले आहे. पण ऑगस्टमधील पावसाने दिलासा मिळाला आहे. काही दिवसांतच चांगला पाऊस ऑगस्टमध्ये झाल्याने तूर बऱ्यापैकी भरून निघाली आहे. .ऑगस्टमध्ये रावेर, जळगाव, जामनेर भागातही पाऊस बऱ्यापैकी झाला आहे. कोरडवाहू कापूस पिकाची वाढ चांगली दिसत आहे. तसेच सोयाबीनच पीकही चांगले वाढू लागले आहे. पावसाने सध्या मका, सोयाबीन, ज्वारी, तूर या पिकांत कोणतीही हानी होणार नाही. तसेच केळी पिकासाठीदेखील पाऊस अनुकूल मानला जात आहे..मोठी तूट झाली कमीऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरवातीला जळगाव जिल्ह्यात पावसाची ४० टक्के तूट होती. नंदुरबारात ही तूट ४५ टक्क्यांवर होती. धुळ्यातही पावसाची प्रतीक्षा होती. पण १६ ऑगस्टनंतर अनेक भागात पावसाने हजेरी लावली व तूट कमी झाली. ही तूट ऑगस्टअखेर अनेक भागात भरून निघाल्याची माहिती मिळाली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.