Amaravati News : अमरावती जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात सतरा दिवसांत झालेल्या पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे २९ हजार ३९२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून २७१ हेक्टर क्षेत्र खरडून गेले आहे. जिल्ह्यात या महिन्यात १९६ मिलिमीटर पाऊस झाला असून तो सरासरीने १०१ टक्के आहे..यंदाच्या खरीप हंगामात जून व जुलै महिन्यांत पावसाची तूट असली तरी या दोन्ही महिन्यांत काही महसूल मंडलांत अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. जूनमध्ये १३१२ व जुलै महिन्यात १७७० हेक्टर क्षेत्रातील पिकांची नासाडी झाली आहे. .Rain Crop Damage : साहेब, आता सगळं संपलं; शेतात फक्त पाणीच पाणी.जुलैमध्ये ४४२ हेक्टर जमीन खरडून गेली. सर्वाधिक हानी एक ते १७ ऑगस्ट या कालावधीत झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. चिखलदरा तालुक्यातील मोझरी येथील आनंद रामकिसन मावस्कर या आठ वर्षीय बालकाचा नदीत पडून वाहून गेल्याने तर धामणगावरेल्वे येथील सुदाम श्यामराव ठाकरे यांचा वीज पडून व महादेव चंद्रभागा गेडेकर (वय ४५) यांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. अंजनगावसुर्जी येथील गोपाल शेवाळे जखमी झाले आहेत. .५३ कुटुंबातील २१६ सदस्यांना स्थलांतरित करावे लागले आहे. यापूर्वी जूनमध्ये पवन दीपक कोल्हे (२५, रा. तूरखेड, अंजनगावसुर्जी) यांचा वीज पडून व जुलैमध्ये स्वरूप प्रशांत गांजरे (वय ३, मोर्शी) या बालकाचा भिंत पडल्याने मृत्यू झाला आहे..Crop Damage Survey : पंचनाम्यास विरोध केल्याने पथक माघारी.रेखा सुखदेव गांजरे (वय ४९, रा. मोर्शी) या जखमी झाल्या. ऑगस्टमध्ये २९ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, तूर, कापूस, मका व धान पिकाचे नुकसान झाले. पावसामुळे उत्पादक घटण्याची शक्यता आहे. २७१ हेक्टर क्षेत्र खरडून गेले आहे..पावसामुळे झालेली जीवित आणि वित्तहानीबळी ः जून ः १, जुलै ः १, ऑगस्ट ः ३शेतीचे नुकसान (हेक्टर )ः जून ः १३१२ , जुलै ः १७७०, ऑगस्ट ः २९,३९२बाधित पिके ः सोयाबीन, तूर, कापूस, धान, मका, ज्वारी, तीळ, कांदा, भाजीपालाघर पडझड (पूर्णतः) ः ३४ अंशतः १५७३मृत जनावरे (लहान) ः २६, मोठे ः ३०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.