Weather Impact on Farming: भोर तालुक्यात तापमानाचा पारा ३९ अंशांवर पोहोचल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. रणरणत्या उन्हामुळे शेतीकामे करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. तसेच प्रखर उन्हाचा फटका भाजीपाला आणि फळबागांना बसत आहे..तालुक्यात सध्या ज्वारी, कांदा आणि गहू काढणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, वाढते तापमान आणि मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत..Agriculture Challenges: शेतकऱ्यांसमोरील आव्हानाची लढाई एकजुटीतून लढावी लागणार: अजित नवले .दुपारी ३९ अंश सेल्सिअसपर्यंत जाणारे तापमान आणि सायंकाळचे ढगाळ वातावरण यामुळे उकाडा वाढला आहे. पूर्वमोसमी पावसाच्या भीतीने काढलेले धान्य आणि चारा सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे..Banana Farmer Challenges: दर तुम्हीच ठरवा, पण केळी न्या!.अति उष्णतेमुळे घेवडा, कलिंगड, काकडी आणि पालेभाज्या करपू लागल्या आहेत. नवीन लागवड केलेली रोपे कोमेजल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे..पाणीटंचाई आणि वाढत्या उष्णतेमुळे पोषक तत्त्वांच्या शोषणात अडथळा येत असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. याचा थेट परिणाम बाजारपेठेतील पालेभाज्यांच्या दरांवर होत असून भाव वधारले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.