Summer Heat: बोधेगाव, ता. शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात वाढत्या उष्णतेमुळे आणि भूजल पातळी खालावल्याने ऊस पिकाची मोठ्या प्रमाणात होरपळ होत आहे. बोधेगावसह बालमटाकळी, सुकळी, लाडजळगाव, शेकटे, आधोडी, दिवटे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. उसाला पुरेसे पाणी मिळत नसल्याने पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत..अजून काही दिवस पाऊस पडला नाही, तर उभा ऊस पूर्णपणे वाळून उत्पादन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. .Sugarcane Cultivation: कडक उन्हातही उसाच्या मशागतीला वेग.याचा परिणाम साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना केवळ १० टक्के रक्कम भरून कृषी सौर पंपांचे वितरण करण्यात आले आहे. .Rain Crop Damage: पावसामुळे पूर्व विदर्भातील ६३०३ शेतकऱ्यांना फटका.त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात पिकांना पाणी देण्याची गरज उरली नाही. मात्र, सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत सौर पंप सलग सुरू राहत असल्याने विहिरींमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत आहे. .त्यातच वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे भूजल पातळी झपाट्याने घटत असून, अनेक विहिरींची पाणीपातळी चिंताजनकरित्या खाली गेल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पहायला मिळत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.