Climate Impact: खानदेशात उष्णता दिवसागणिक वाढत आहे. कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले असून, पिकांना मोठा फटका बसत आहे. .मागील आठवड्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत होते. या आठवड्यात कमाल तापमान सतत वाढत आहे. यामुळे पिकांनाही मोठा फटका बसत असून, केळी, भाजीपाला पिके होरपळत आहेत. उत्पादकतेसही फटका बसणार आहे..Heatwave Crop Damage : कांदा उत्पादनाला अतिउष्णतेचा फटका.उष्णता वाढल्याने शेतीकामांना सतत फटका बसत आहे. मागील आठवड्यात तर सायंकाळी पाच ते साडेसात या दरम्यान अनेकांनी शेतीकामे उरकली. तर काहींनी सकाळी सहा ते नऊ या कालावधीत कामे उरकून घेण्यासाठी धावपळ केली आहे. सध्या शेतातून कुट्टीची वाहतूक, शेतात खते, माती, गाळ टाकणे, पूर्वमशागत आदी कामे सुरू आहेत..Heatwave Impact: कडक उन्हामुळे आंब्याला फटका.मागील महिन्यात कमाल तापमान सुरुवातीला ३८ अंश सेल्सिअस होते. नंतर त्यात सतत वाढ झाली व कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोचले. महिन्यात काही दिवसांपूर्वी पावसाने तापमान कमी झाले. पण आता तापमानात वाढ होत आहे. खानदेशात धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील नंदुरबार, तळोदा, शहादा, जळगावातील चोपडा, जळगाव, यावल, रावेर, जामनेर आदी तालुक्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे..सिंचनाची धावपळपिकांना रोज सात ते आठ तास पाणी देऊनही पिकांची वाढ हवी तशी नाही. तापमान वाढल्याने लहान केळीची पाने पिवळी, लाल पडत आहेत. पोंगा लागलीच होरपळत आहे. दुपारी उष्ण वारा असतो. सायंकाळीदेखील उष्णता असते. त्यात ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत झालेल्या वादळी पावसाने केळीची पाने फाटली असून, प्रकाश संश्लेषणाची गती, क्रिया संथ झाली आहे. केळीसह अन्य भाजीपाला पिकांची होरपळ होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.