Banana Farming: खानदेशात केळी लागवड रखडली आहे. उष्णता अधिक आहे. त्यात केळी रोपांना उष्णतेचा फटका बसत असल्याने अनेक जण तापमान कमी झाल्यानंतर लागवडीला सुरुवात करतील, असे दिसत आहे..सप्टेंबरमध्ये काही भागात केळी लागवड झाली. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये कांदेबाग केळीची लागवड खानदेशात केली जाते. जळगाव जिल्ह्यात चोपडा, पाचोरा-भडगाव, जामनेर, जळगाव, धुळ्यातील शिरपूर या भागात कांदेबाग केळीची लागवड अधिक असते. रावेर, यावल भागात अपवादानेच काही शेतकरी लागवड करतात. या केळी लागवडीसाठी कमाल शेतकरी केळीचे कंद उपयोगात आणतात. .Banana Cultivation Issue: केळी लागवडीसाठी दर्जेदार कंद मिळेनात.दर्जेदार केळीचे वाण किंवा कंद लागवडीवर शेतकऱ्यांचा भर असतो. त्यासाठी आंबेमोहोर, श्रीमंती, महालक्ष्मी, सातमासी व ग्रॅण्ड नैन या वाणांच्या कंदांना शेतकरी पसंती देतात. केळी कंद औरंगाबादमधील कन्नड, सोयगाव, जळगावमधील जामनेर, रावेर, यावल, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा या भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत..Jalgaon Okra Cultivation : जळगावात भेंडी पीक क्षेत्र घटले.यंदा ऑक्टोबर हिट अधिक आहे. सप्टेंबरमध्येही तापमान होते. कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस असे आहे. सकाळी १० ते सायंकाळी पाच यादरम्यान उष्णता असते. हलक्या, मध्यम जमिनीत काळ्या कसदार क्षेत्रातील कंद लागवडीला शेतकरी पसंती देतात. तर काळ्या कसदार जमिनीत हलक्या, मध्यम जमिनीत कंद लागवडीला पसंती दिली जाते. कंद लागवड काही शेतकरी करून घेत आहेत. परंतु गेले २० ते २५ दिवस खानदेशात उष्णता अधिक आहे..लागवड घटणारयंदा जळगाव जिल्ह्यात कांदेबाग केळीची सुमारे १८ ते २० हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी अपेक्षा आहे. पण जामनेर, भुसावळ व भडगावातील लागवड घटेल. कारण या भागात जलसाठे मुबलक नाहीत. यंदा कंद, केळी रोपे मुबलक आहेत. केळी रोपांचे दर १० ते १६ रुपये प्रतिरोपे, असे आहेत. अनेक कंपन्या उधारीने केळी रोपे देण्यास तयार होत आहेत. पण प्रतिकूल स्थितीमुळे केळी लागवडीवर यंदा परिणाम झाल्याचे दिसत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.