Seasonal Wild Vegetables: श्रीमती नीलिमा व्ही. पाटील, डॉ. किशोर झाडेपावसाळी हंगामामध्ये गाव परिसरामध्ये सहज व नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. या भाज्या चवीला रुचकर असून, विविध जीवनसत्त्वे, खनिजे व तंतुमय पदार्थ (फायबर) यांनी परिपूर्ण आहेत. यातील बहुतांश वनस्पती आपल्या परिसरात उगवत असूनही त्यांच्या उपयुक्ततेची, औषधी गुणधर्मांची माहिती नसते. गेल्या आठवड्यापासून आपण या रानभाज्यांची माहिती घेत आहोत. .करंजीशास्त्रीय नाव : Momordica cymbalariaकूळ : Cucurbitaceaeस्थानिक नावे : करंजी/कडुली/कडवंची/रान कारलेइंग्रजी नाव : Kakrolखाण्यायोग्य भाग : कोवळी फळेउपलब्धता : जुलै ते सप्टेंबरअभिवृद्धी : बियावापर : भाजीपोषकतत्त्व :करंजीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व क, कॅल्शिअम, पोटॅशिअम, सोडिअम व तंतुमय पदार्थ आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हाडे व दातांना मजबुती देते. पोटॅशिअम स्नायूचे आकुंचन होण्यासाठी आवश्यक आहे. सोडिअम शरीराला आवश्यक पाचक रसायनाची निर्मिती करतात.औषधी गुणधर्म :भाजी मधुमेहींसाठी उपयुक्त असून, रक्तातील साखर कमी करते.रेचक असून, बद्धकोष्ठता व मूळव्याधीवर फायदेशीर ठरते.अँटीओक्सिडेंटमुळे कर्करोरी व्यक्तींसाठी फायदेशीर.वात, अल्सर, त्वचारोग आणि अतिसाराच्या उपचारांसाठी वापरतात.पारंपरिक पदार्थ : भाजी, डाळ घालून भाजी.Wild Vegetables : आरोग्यदायी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व.केनाशास्त्रीय नाव : Commelina benghalensis L.कूळ : Commlinoidaceaeस्थानिक नावे : केना/जलजंबाइंग्रजी नाव : Benghal dayflower/Tropical spiderwortखाण्यायोग्य भाग : कोवळी पानेउपलब्धता : जुलै ते सप्टेंबरअभिवृद्धी : बियावापर : भाजीपोषणतत्त्वे :जीवनसत्त्व अ, कॅल्शिअम, फॉस्फरस, तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. ही भाजी डोळ्यांच्या आरोग्याकरिता फायदेशीर असून, त्यातील फॉस्फरस व कॅल्शिअम हे हाडे व दातांना मजबुती देतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पचनक्रिया सुरळीत ठेवते.औषधी गुणधर्म :रातांधळेपणा, डोळ्याचा कोरडेपणा कमी करण्याकरिता भाजीचे सेवन करावे.डोकेदुखी, दातदुखीवर उपयुक्त आहे.मूत्रवर्धक असून, कोठागी साफ ठेवण्यास मदत करते.सूज कमी करते, जखमा भरून काढते.कुष्ठरोग्यास फायदेशीर आहे.पारंपरिक पदार्थ : कोवळ्या पानांची भाजी, गोळे, भाजी.फांदीशास्त्रीय नाव : Riveahypocrateriformis (Desr.) Choisyकूळ : Convolvulaceaeस्थानिक नावे : फांदी/फांद/फांजी/सांजवेलइंग्रजी नाव : Midnapore Creeperखाण्यायोग्य भाग : कोवळी पाने व फुलेउपलब्धता : पाने- जून ते सप्टेंबरफुले- ऑगस्ट-ऑक्टोबरअभिवृद्धी : बियावापर : भाजीपोषणतत्त्वे : अ व क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. ऊर्जा आणि सूक्ष्म पोषक घटकांचा चांगला स्रोत आहे. प्रथिने व तंतुमय पदार्थ आहेत.औषधी गुणधर्म:खोकला, त्वचारोग, डोकेदुखी आणि दमा यांसारख्या आजारात पौष्टिक पालेभाजी म्हणून वापरतात.वात, पित्त, हृदयरोग, आमदोष व वेदना यांवर उपयुक्त आहे.मूळव्याधीत भाजीचे सेवन फायदेशीर आहे.पारंपरिक पदार्थ : कोवळ्या पानांची भाजी, भाकरी, गोळा भाजी, फुलांची भाजी..Healthy Wild Vegetables : आरोग्यदायी रानभाजी करटोली, लाल माठ.कुयरीशास्त्रीय नाव : Mucuna pruriensकूळ : Fabaceaeस्थानिक नावे : कुयरी/कुहिली/कुहिरी/कवचबीजइंग्रजी नाव : Horse eye bean/Velvet bean/Cowhageखाण्यायोग्य भाग : कोवळ्या शेंगा, ओले दाणे व वाळलेल्या बियाउपलब्धता : शेंगा, ओले दाणेअभिवृद्धी : बियावापर : भाजीपोषणतत्त्वे : यांच्या शेंगांमध्ये लोह, कॅल्शिअम, जीवनसत्त्व क व तंतुमय पदार्थ भरपूर आहेत. बियांमध्ये प्रथिने, थायामीन, रिबोफ्लेवीन असून, पोटॅशिअम मॅंगेनीज, सोडिअम, फॉस्फरस, कॉपर, झिंक ही खनिजे मुबलक आहेत.भरपूर लोहामुळे अॅनिमिया कमी करते. कॅल्शिअम व मँगनीज हाडे व दातांना मजबुती देते. जीवनसत्त्व क रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. थायामीन शरीराची सामान्य वाढ व मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आवश्यक आहे. रिबोफ्लेवीन हे तोंड, जीभ व डोळे यांच्याकरिता आवश्यक आहे. तंतुमय पदार्थ पचन करण्यास मदत करते.औषधी गुणधर्म :जंत व पित्ताकरिता उपयुक्त आहे.कंपवातावर (Parkinson) गुणकारी.मधुमेह, संधिवात, त्वचा रोगामध्ये गुणकारी आहे.पुरुषाच्या वंध्यत्व समस्येवरील औषधामध्ये वापर होतो.नैराश्य (डिप्रेशन) कमी करते. स्वच्छ झोप व एकाग्रता वाढविते.पारंपरिक पदार्थ : कच्च्या कुयऱ्या, भाजी, रस्सा भाजी, ओल्या दाण्याची उसळ, सुक्या दाण्याची उसळ.टाकळा / तरोटाशास्त्रीय नाव : Cassia Toraकुळ : Caesalpinaceaeउपयुक्त भाग - पानेइंग्रजी नाव - Foetid Cassiaस्थानिक नाव - तरोटा, तरवटाऔषधी गुणधर्म :लहान मुलांना पोटातील जंतांचा त्रास कमी करण्यासाठी टाकळ्याची भाजी खाऊ घालावी.ज्वरनाशक असून, लहान मुलांना दात येतेवेळी आलेल्या तापावर टाकळ्याच्या पानांचा काढा दिला जातो.टाकळा रेचक (मलसारक) आणि पचनास मदत करणारा आहे.हृदयरोग आणि यकृतासाठी उत्तम टॉनिक.टाकळ्याची भाजी मधुमेहावर (शुगर) नियंत्रण ठेवण्यास मदत करते.थायरॉइडवर उपयुक्त.पोषणतत्त्वे :टाकळ्याची भाजी प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. सुक्या टाकळा भाजीमधून भरपूर प्रथिने मिळतात.कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात आढळते. ते हाडांच्या आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.टाकळ्यातील लोह शरीरातील रक्ताची कमतरता (ॲनिमिया) दूर करते.हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअमसोबत फॉस्फरसची आवश्यकता टाकळ्यातून पूर्ण होते..चिघळशास्त्रीय नाव : Portutacaqudrifidaउपयुक्त भाग : पानेस्थानिक नाव : घोळभाजी, चिवळशास्त्रीय नाव : Portulaca Oleraceaइंग्रजी नाव : Benghal Deflowerकालावधी : जून ते सप्टेंबरऔषधी गुणधर्मचिवळ भाजीमध्ये कॅलरीज कमी आणि पोषणमूल्ये जास्त असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी, हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त. हाडे मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी. ही भाजी उपयुक्त ठरते.मटारूशास्त्रीय नाव : Dioscorea bulbifera Linnकुळ : Dioscoreaceaeउपयुक्त भाग : पाने, फळेपोषणतत्त्वेमटारू भाजीमध्येही जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स), खनिजे (मिनरल्स) आणि तंतुमय पदार्थ (फायबर) आहे. हे घटक शरीराचे उत्तम कार्य आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असतात.श्रीमती नीलिमा व्ही. पाटील, ८२०८७८८२७६ कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.