Healthcare Access Issues: पुणे कृषी महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेले सुसज्ज आरोग्य केंद्र मागील सहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. लाखो रुपये खर्चून बांधलेली ही इमारत सध्या झाडाझुडपांनी वेढली गेली असून, आजारी विद्यार्थ्यांना उपचारांसाठी बाहेरील खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे, अशी माहिती येथील विद्यार्थी व प्राध्यापकांनी दिली..महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या पुणे कृषी महाविद्यालयात सध्या सुमारे १,६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण येथील आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत सहा वर्षांपासून टाळे लागलेल्या अवस्थेत उभी आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी (ता.२४) महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर तातडीने उपचार न मिळाल्याने अखेर प्रशासनाला बाहेरील खासगी दवाखान्यात नेण्याची वेळ आली होती..Healthcare Services: आरोग्य सुविधा अधिक सक्षम केल्या जातील.२०१९ मध्ये नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण२०१७-१८ मध्ये तत्कालीन कुलगुरू के. पी. विश्वनाथ यांच्या कार्यकाळात आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत उभारण्यात आली. तत्कालीन सहयोगी अधिष्ठाता प्रा. प्रमोद रसाळ यांच्या पाठपुराव्यामुळे सुसज्ज उपकरणांसह २०१९ मध्ये या नव्या इमारतीत आरोग्य केंद्र सुरू झाले. मात्र कोरोनाचा काळ सुरू होण्यापूर्वीच हे केंद्र बंद पडले आणि मागील सहा वर्षांपासून ते कुलूपबंद अवस्थेतच आहे..दरवर्षी पाच लाखांचे बजेटया आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांना मोफत तपासणी व औषधे, तर शिक्षकांना नाममात्र दरात उपचार दिले जात होते. यासाठी दरवर्षी सुमारे पाच लाख रुपयांचे बजेट मंजूर केले जात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली..Rural Health Center : ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रे कमकुवत.‘तातडीने आरोग्य केंद्र सुरू करा’विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले हे केंद्र तातडीने सुरू करावे, डॉक्टर व कर्मचारी नियुक्त करावेत आणि नियमित आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी येथील विद्यार्थी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांकडून होत आहे..विद्यार्थ्यांची व्यथामाजी कुलगुरू प्रशांतकुमार पाटील यांच्या कार्यकाळात हे केंद्र पूर्णतः बंद पडले. सध्या विस्तार विभागाच्या सहायक प्रा. पल्लवी सूर्यवंशी यांच्याकडे आरोग्य अधिकाऱ्यांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात या केंद्राकडे कुणाचेही लक्ष नाही, अशी व्यथा येथील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.