Jalgaon News : तापी नदीचे पुरात वाहून जाणारे पाणी अडविण्याची व ते वापरण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने यंदा हतनूर मध्यम प्रकल्पातून हा प्रकल्प १५ वेळा भरून वाहील, एवढे पाणी अरबी समुद्रात वाहून गेले आहे. प्रकल्पातील किमान ५४ टक्के गाळामुळे प्रकल्पाचा जीवंत पाणीसाठा निम्म्यावर आला, याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे..तापी नदीवर तापी पूर्णा संगमाजवळ १९७८मध्ये जिल्ह्याचे तत्कालीन नेते मधुकरराव चौधरी यांच्या प्रयत्नातून हतनूर मध्यम प्रकल्प उभारण्यात आला. जिल्ह्यातील हा सर्वात मोठा व महत्त्वाचा प्रकल्प आहे. १०० टक्के साठा असताना प्रकल्पाची सर्वाधिक जलपातळी २१४ मीटर असते. प्रकल्पाची पाणीक्षमता ३८८ दशलक्ष घनमीटर आहे. .Hatnur Dam : हतनूर धरणातील गाळामुळे जलसाठ्यावर परिणाम.या प्रकल्पातून जळगाव व भुसावळची एमआयडीसी, भुसावळ रेल्वे, दीपनगर वीजप्रकल्प, रावेर, सावदा, वरणगाव आदी शहरांसह परिसरातील सुमारे ८० गावांच्या पाणीयोजना अवलंबून आहेत. तापी नदीवरील दोन्ही काठांवरील सर्वच गावांची शेती या प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे..प्रकल्पात ५४ टक्के गाळया प्रकल्पात तापी नदीच्या उगमापासून वाहत आलेला गाळ मोठ्या प्रमाणात जमा आहे. नाशिक येथील ‘मेरी’ या संस्थेने २०१८मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार तेव्हा प्रकल्पात ५४ टक्के गाळ होता. त्यानंतर आता २०२४मध्ये पुन्हा सर्वेक्षण झाले आहे. मात्र, त्याचा अहवाल अजून उपलब्ध झाला नाही. मात्र, दरम्यानच्या काळात हा गाळ वाढून ६० टक्क्यांपेक्षा जास्त असावा व जेमतेम ४० टक्केच जीवंत साठा असावा, असा अंदाज आहे. त्यामुळे प्रकल्पात गाळ जास्त व पाणी कमी आहे. यातील गाळ वेळीच वाहून गेला नाही किंवा काढला नाही, तर हळूहळू हा प्रकल्प ''मृत प्रकल्प'' होण्याची भीती आहे..पंधरा पट पाणी गेले वाहूनएक जून २०२५ ते ३ ऑक्टोबर २०२५दरम्यान प्रकल्पाच्या दरवाज्यांतून आतापर्यंत ५,८८६ दशलक्ष घनमीटर पाणी तापी नदीत सोडले. प्रकल्पाची क्षमता पाहता तो १५ वेळा भरला असता, एवढे पाणी नदीत सोडून ते अरबी समुद्रात वाहून गेले. जिल्ह्याच्या वाट्याचे हे पाणी अडवून अन्य ठिकाणी वापरण्याची सुविधा उपलब्ध नाही किंवा लोकप्रतिनिधींनी या पाण्याचा अन्यत्र वापर करण्याची कुठलीही उपाययोजना केली नाही, असेच म्हणावे लागेल. .Hatnur Dam : ...आतापर्यंत केवळ हतनूर सिंचन प्रकल्पातूनच विसर्ग सुरू.प्रकल्पातील अतिरिक्त पाणी नदीत सोडण्यासाठी ४१ दरवाजे बसविले आहेत. मात्र, यावर्षी सर्व ४१ दरवाजे पूर्णपणे उघडून पाणी नदीत सोडण्याचा प्रसंग एकदाही आला नाही. १९ ऑगस्ट २०२५ला या प्रकल्पाचे २४ दरवाजे पूर्णपणे व ६ दरवाजे १ मीटरने उघडले होते. याआधी अनेकदा सर्व ४१ दरवाजे उघडून अतिरिक्त साठा नदीत सोडण्याच्या प्रसंग आले आहेत.प्रकल्पाची ३ ऑक्टोबरला स्थितीपाणीपातळी ः २१३.६७० मीटरएकूण साठा ः ३६८.२० दशलक्ष घनमीटर.आठ दरवाजांचे काम अपूर्णप्रकल्पाच्या डाव्या बाजूच्या ४१ दरवाजांपेक्षा कमी उंचीवर नवीन ८ दरवाजे बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, निधीअभावी काम कासव गतीने सुरू आहे. काम पूर्ण झाल्यास आणीबाणीप्रसंगी प्रकल्पातील अतिरिक्त पाणी वेगाने नदीत सोडण्यास मदत होईल. हे नवीन ८ दरवाजे खालच्या बाजूला असल्याने प्रकल्पातील काही प्रमाणात गाळही वाहून जाईल, अशी योजना आहे. एक ऑक्टोबरपासून प्रकल्पात १०० टक्के साठा करण्याचे नियोजन होते. १० ऑक्टोबरला सर्व दरवाजे बंद करून प्रकल्पात १०० टक्के साठा केला जातो. त्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केल्याची माहिती अभियंता भावेश चौधरी यांनी दिली. आज या प्रकल्पात ९२.१४ टक्के साठा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.