ठळक मुद्देहरियाणा सरकारने बाजरी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहेराज्य सरकार प्रति क्विंटल २,२०० रुपये दराने बाजरीची खरेदी करेलयाशिवाय शेतकऱ्यांना भावांतर भरपाई योजनेअंतर्गत प्रति क्विंटल ५७५ रुपये मिळतीलयामुळे शेतकऱ्यांना एकूण प्रति क्विंटल २,७७५ रुपये रक्कम मिळेल.Millet Procurement Price: हरियाणा सरकारने बाजरी उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी बाजरी खरेदी दरांत सुधारणा केली आहे. यानुसार, राज्य सरकार प्रति क्विंटल २,२०० रुपये दराने बाजरीची खरेदी करेल. यापूर्वी हा दर २,१५० रुपये होता. .याव्यतिरिक्त, शेतकऱ्यांना भावांतर भरपाई योजनेअंतर्गत प्रति क्विंटल ५७५ रुपये थेट मिळतील. यामुळे शेतकऱ्यांना एकूण प्रति क्विंटल २,७७५ रुपये एवढा भाव मिळेल. हा भाव केंद्र सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमती (MSP) शी सुसंगत असा आहे..Bajari Crop : बाजरी पक्वतेच्या मार्गावर; पीकही जोमात.अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या माहितीनुसार, सध्याचा बाजारभावाचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास योग्य भाव आणि वाढीव उत्पन्न सुरक्षेची खात्री मिळेल..राज्य सरकारकडून असे स्पष्ट करण्यात आले आहे की, खासगी व्यापाऱ्यांना प्रति क्विंटल २,२०० रुपयांहून अधिक दराने बाजरीची विक्री करणारे शेतकरी भावांतर भरपाई योजनेअंतर्गत प्रति क्विंटल ५७५ रुपयांची रक्कम मिळवण्यासाठी पात्र असतील. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास एमएसपीपेक्षा अधिक भाव मिळेल..Bajra Farming: बाजरी पीक कणीस, फुलोरा अवस्थेत.सरकारने खरीप हंगामासाठी खरेदी २३ सप्टेंबरपासून सुरु केली आहे. ही खरेदी प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरु होणार होती. पण त्यापूर्वीच सरकारने खरेदी सुरु केली आहे. सरकारने खरेदीसाठी ९२ बाजार समित्या आणि केंद्रांमध्ये व्यवस्था केली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, ५,०६,३१३ शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत “मेरी फसल, मेरा ब्योरा” पोर्टलवर नोंदणी केली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.