Dharashiv News : जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अनुषंगाने मूग व उडीद पिकांचे पीक कापणी प्रयोग सुरू करण्यात आले आहेत. या माध्यमातून पुढे आलेल्या उत्पादना आधारे पीकविमा नुकसान भरपाई निश्चित केली जाते. यामुळे शेतकऱ्यांनी प्रयोगाकडे सतर्कतेने लक्ष द्यावे, असे आवाहन `मित्र`चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे..जिल्ह्यात मूग व उडीद पिकांचे पीक कापणी प्रयोग सुरु झाले असून ३५ हजार ३१६ शेतकऱ्यांनी १४ हजार ९९८ हेक्टरवरील क्षेत्राचा उडीद पिकाचा तर नऊ हजार २०८ शेतकऱ्यांनी दोन हजार ५६० हेक्टरवरील मूग पिकाचा विमा हप्ता भरला आहे. त्यामुळे मूग व उडीद उत्पादक शेतकरी बांधवांनी अधिक जागरूकपणे या सगळ्या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. .Crop Cutting Experiment: पीककापणी प्रयोगात मोईश्चर मीटरचा वापर बंधनकारक करावा.ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत १६० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. परिणामी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सरसकट पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे..पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून उत्पादन निश्चित करून त्याप्रमाणे विमा नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते. त्यामुळे या प्रक्रियेवर सर्वांनीच अधिक सतर्क होऊन लक्ष देणे गरजेचे आहे..Crop Cutting Experiment : पीक कापणी प्रयोगात अचूकता राखणे आवश्यक.जिल्ह्यात मूग व उडीद पिकांचे पीक कापणी प्रयोग हे मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, शेतकरी प्रतिनिधी, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत केले जात आहेत. .या प्रयोगाद्वारेच निश्चित उत्पन्नाच्या आधारे पीक विमा नुकसान भरपाईची ठरवली केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने पीक कापणी प्रयोग अत्यंत महत्त्वपूर्ण असून शेतकऱ्यांनी या प्रक्रियेवर लक्ष द्यावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.