Thane News: ‘हर घर नल से जल’ ही योजना सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केली खरी. परंतु, कायम टंचाईग्रस्त आणि दऱ्याखोऱ्यांचा आदिवासी बहुल तालुका असलेल्या शहापूर तालुक्यात या योजनेचे अनुदानच रखडले आहे. त्यामुळे १४१ पाणीयोजनांना खीळ बसली असून हंडाभर पाण्यासाठी कडाक्याच्या थंडीत महिला आणि आबालवृद्धांची पायपीट करावी लागत आहे. दुसरीकडे, सरकारने शहापूर तालुक्यातील टंचाई निवारणासाठी अनेक योजनांची घोषणा करून देखील प्रत्यक्षात येथील पाणीटंचाई संपुष्टात आलेली नाही. .शहापूर तालुक्यात गावे, वाड्या-वस्त्यांमधील घरांपर्यंत नळ न पोहोचल्याने डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या पाणीटंचाईचा कालावधी जून महिन्यापर्यंत असतो. या परिस्थितीत टँकरने पाणीपुरवठा करूनच दिलासा द्यावा लागतो. मागील दोन वर्षांपासून तालुक्यात हर घर नल योजनेचा बोलबाला सुरु होता. .Water Supply Scheme : शाहूनगर, विलासपूरची सुटणार जलकोंडी.केंद्र सरकारने २३५ कोटी रुपये खर्चांच्या १९४ योजना जाहीर केल्या होत्या. त्यापैकी तब्बल १४१ योजनांना आजतागायत निधीच देण्यात आलेला नाही. तर इतर सहा योजना वनजमीन व स्थानिकांमधील वाद अशा प्रकारच्या विविध अडचणींमुळे सुरू झालेल्या नाही. या योजनेवर आतापर्यंत ८१ कोटी रुपयांचा निधी खर्च झाल्याचे सांगितले आहे..तालुक्यातील वेहलोंढे, अघई, गरेलपाडा, तानसा, पाषाणे, काजळविहीर, कातकरीवाडी, दहीगांव, बोधने, दापूर, माळ या सहा योजना वनजमिनीचा अडथळा व विविध स्थानिक प्रश्नांमुळे अद्यापही सुरू झालेल्या नाही. दरम्यान, याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता होऊ शकला नाही..Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजनांसाठी सूक्ष्म नियोजन करावे.वर्ष संपत आले तरी काम ठप्पहर घर नल ही योजना २०२३ मध्ये सुरू झाली. ती यंदा या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु १४१ योजनांना केंद्र सरकारकडून निधीच न मिळाल्याने या योजनांची कामे ठप्प झाली आहेत..धरण उशाशी, पण घशाला कोरडतालुक्यातील तानसा, मोडकसागर, भातसा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होतो. मात्र, हे तालुक्याच्या हक्काचे असूनही ते स्थानिकांना मिळत नाही. पावसाळा संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच नाल्यांसह विहिरी, हातपंप आटून कोरडे पडतात. त्यामुळे नाईलाजाने दुर्गम भागातील डोंगर-दऱ्यांतून वाट काढत गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तालुक्यातील ९७ गावे आणि २०० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांसाठी दोन हजार ७०० कोटी रुपये खर्चाची भावली धरणावरील योजना देखील विविध अडथळ्यांच्या कचाट्यात सापडल्याने अद्यापही पूर्णत्वास आलेली नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.