Amaravati News : जिल्ह्यात हमीभावाने विक्रीकरिता ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यातील अर्ध्याच शेतकऱ्यांकडून ज्वारीची खरेदी करण्यात आली. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून फरकाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. .स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमित अढाऊ यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्फत अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे, त्यानुसार, केंद्र शासनाने आरोग्यासाठी पोषक म्हणून देशभरात धान्याला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली होती. .Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीत अनियमितता.त्याला प्रतिसाद देत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्वारीचा पेरा वाढविला. रब्बी २०२४-२५ या वर्षातील या ज्वारीच्या हमीभावाने खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यात सुमारे ३२०६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. यातील केवळ १५४३ शेतकऱ्यांकडूनच ज्वारीची खरेदी करीत उद्दिष्टाची पूर्ती झाल्याचे सांगत केंद्र बंद करण्यात आले. .Rabi Jowar Variety : रब्बी ज्वारी लागवडीसाठी वाण.परिणामी १६६३ शेतकरी ज्वारी विक्रीपासून वंचित राहिले. यातील काही शेतकऱ्यांनी पैशाची निकड म्हणून खुल्या बाजारात कमी दराने ज्वारी विकून टाकली. यामध्ये त्यांना नुकसान सोसावे लागले. .काही शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्र सुरू होईल या अपेक्षेने ज्वारी साठवून ठेवली आहे. त्याची दखल घेत शासनाने ज्वारी खरेदीस मुदतवाढ देत नोंदणी केलेल्या शेतकऱ्याकडून ज्वारी खरेदी करावी. हे शक्य नसल्यास हमीभाव व बाजार भाव यातील फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी स्वाभिमानीने केली आहे. यावेळी संजय आपकाजे, स्वप्नील कोठे, प्रफुल्ल उमरकर, प्रशांत शिरभाते, दिनेश आमले, परशुराम परिसे यांची उपस्थिती होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.