Weather Update: गेल्या काही दिवसांपासून सोसाव्या लागणाऱ्या प्रचंड उष्णतेनंतर रविवारी (ता. २९) जिल्ह्याच्या हवामानात अचानक बदल झाला. सायंकाळच्या सुमारास बागलाण, चांदवड, येवला आणि मालेगाव तालुक्यांना वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांसह पूर्वमोसमी पावसाने झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीला आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग गेल्या आठ दिवसांत दुसऱ्यांदा संकटात सापडला आहे..चांदवड तालुक्याच्या पूर्व भागात दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने अनेक ठिकाणी घरांचे आणि शेडचे पत्रे उडाले. तालुक्यातील बोपाणे, दिघवद, हिवखेडे, काजीसांगवी, पन्हाळे, हरनूल, हरसूल, दुगाव, निंबाळे, पाथरशेंबे, न्हनावे आणि आहेरखेडे परिसरात मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने काढणीला आलेला गहू, हरभरा आणि उन्हाळ कांदा या पिकांना फटका बसला. विशेषतः कांदा बियाण्यासाठी लावलेले डेंगळे पडल्याने बीजोत्पादन क्षेत्राचे नुकसान आहे.Unseasonal Rain Damage: रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग.येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातही परिस्थिती सारखीच होती. दुपारी चारच्या सुमारास नगरसूल, राजापूर, जायदरे, पन्हाळेसाठे आणि कोळगाव परिसरांत हलक्या गारांसह पाऊस झाला. नगरसूल आणि कोळगाव परिसरात झाडे उन्मळून पडली. शेतात काढून ठेवलेला कांदा आणि गहू पावसामुळे भिजला असून, शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली..Unseasonal Rain Crop Damage: अवकाळी, गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु, शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषिमंत्र्यांची विधानसभेत माहिती.बागलाण तालुक्यातील लखमापूर आणि पूर्व भागात पावसाचा जोर अधिक होता. येथे द्राक्षवेलींच्या फांद्या तुटून पडल्या, तर भाजीपाला आणि कांदा बीजोत्पादनाची डेंगळे गळून पडली. मालेगाव तालुक्यातही पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली असून, तिथे डाळिंब, कांदा आणि गहू पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे..सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील वडगाव पिंगळा, विंचूरी दळवी, मानोरी या गावांमध्ये कांदा, गहू, स्वीटकॉर्न व भाजीपाला पिकांचे नुकसान आहे.पावसामुळे जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाकडून तातडीने या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.