Weather Impact: नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (ता. २) दुपारच्या सुमारास निफाड, सिन्नर, येवला व नाशिक तालुक्यांत वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे काढणीला आलेल्या कांदा, गहू आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आस्मानीशी दोन हात करणारा शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे..निफाड तालुक्यातील पूर्व-पश्चिम पट्ट्यात दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. विंचूर, रुई, देवगाव, सारोळे थडी, नांदूर मधमेश्वर या भागात गारपीट झाली. थेरगाव परिसरातही गारांचा पाऊस झाल्याने काढणीला आलेल्या कांद्याला मोठा फटका बसला आहे. पात तुटल्याने आणि शेतात पाणी साचल्याने कांदा सडण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी हतबल झाला आहे..Nashik Rain Damage: मॉन्सूनपूर्व पावसाने नाशिकमध्ये ८३८ हेक्टरवर पिकांसह नुकसान.सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पाथरे, तर पश्चिम पट्ट्यात चास परिसरात पावसाचा जोर वाढला होता. पूर्व भागातील पाथरे, तर पश्चिम पट्ट्यात चापडगाव, चास, धुळवड, सोनेवाडी परिसरात पावसाचा जोर होता. गारपिटीमुळे कांदा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. शेवटच्या टप्प्यात काढणीसाठी असलेले गहू पीक आडवे झाले असून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. .Nashik Rain Damage: इगतपुरी, निफाडमध्ये पावसाने झोडपले; ४६ गावांमध्ये पिकांचे नुकसान.दुसरीकडे, येवला तालुक्यातही मेघगर्जनेसह हलका पाऊस झाला. अनेक ठिकाणी कांदा काढणीची लगबग सुरू असतानाच पावसाने मोठी धांदल उडाली आणि शेतात साठवून ठेवलेला माल भिजला. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली आहे. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, पावसाच्या सरींमुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची भीती आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे..कांदा पिकाला फटकापावसासोबत जोरदार वादळी वारा तसेच काही ठिकाणी गारपीटही झाली. या अचानक झालेल्या पावसामुळे काढणीला आलेला व शेतात वाळवणीसाठी टाकलेला कांदा पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून असल्याने तो पावसाच्या पाण्यात भिजून खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.