डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. राजीव काळे, डॉ. विजय महाजनFarmer Advisory : राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी वादळी पाऊस झाल्यामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पुढील उपाययोजना केल्यास संभाव्य नुकसान कमी करता येईल..कांदा पीक पुनर्लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांचे झाले आहे. अशा रोपांची काही प्रमाणात हानी झाली असल्यास, ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. तसेच १९:१९:१९ हे विद्राव्य खत पाण्यातून द्यावे. रोपे पूर्णपणे कोलमडली असल्यास, नत्र: स्फुरद : पालाश : गंधक (विद्राव्य खते) २५:२०:२०:१० किलो प्रति हेक्टर या प्रमाणे मातीतून द्यावे. त्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते..Hailstorm Crop Damage: मराठवाड्यात गारपिटीचा साडेअकरा हजार हेक्टरवर फटका.पुनर्लागवडीनंतर ६० ते ९० दिवसांच्या अवस्थेत रोपे असल्यास, रोगांचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता,ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. नवीन येणाऱ्या पानांवर १९:१९:१९ हे १० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारावे.वादळी पाऊस किंवा गारपीटग्रस्त स्थितीत काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकाची त्वरित काढणी करावी. काढणी झालेल्या कांद्यांची सुकवण करून ताबडतोब विक्री करावी..कांदा काढणीकांदा पीक माना पडण्याच्या स्थितीत असताना पावसामुळे नुकसान झाले असल्यास, शेतातून अतिरिक्त पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी. शेत कोरडे झाल्यावर ऊन पडल्यावर कांद्याची काढणी करावी. काढणीनंतर कांदा पातीसह शेतामध्ये उन्हात ३ ते ४ दिवस सुकू द्यावा.कापणीवेळी साधारण २ ते ३ सें.मी. लांबीच्या माना ठेवून कांदे कापावेत. त्यानंतर कांदे निवडून साधारण १५ दिवस ३ ते ४ फुटांचा ढीग करून सावलीत सुकवावे. हे कांदे साठवणीत ठेवायचे असल्यास, हवा खेळती राहील अशा प्रकारच्या साठवणगृहात ठेवावेत..बीजोत्पादनाचा कांदापावसामुळे बीजोत्पादनाच्या कांदा पिकाचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले असल्यास,ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.१९:१९:१९ हे पाण्यात विरघळणारे खत १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून द्यावे. बोरिक अॅसिड दीड ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारल्यास बीजोत्पादनामध्ये मदत होते..Hailstorm Crop Damage : गारपिटीने पिंपळगावलेंडी शिवारातील द्राक्ष बाग उद्ध्वस्त.महत्त्वाचेपानांवर फवारणी करताना पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार फवारणी द्रावणात अर्धा ते १ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात स्टिकरचा वापर करावा.दोन दिवसांपेक्षा अधिक काळ सतत ढगाळ वातावरण असल्यास, पीक चांगले असले तरीही वरीलपैकी एका बुरशीनाशकाची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.फुलकिड्यांचा प्रादुर्भाव आढळल्यास, फिप्रोनिल २ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस २ मि.लि प्रति लिटर पाणी या प्रमाणे स्टिकरसह फवारणी करावी.शेतामध्ये साचलेले पाणी त्वरित बाहेर काढावे..कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. .लेबल क्लेम वाचावेत.पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.रसायनांचा गट तपासावा.पीएचआय, एमआरएल तपासावेत..पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा.पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.- डॉ. शैलेंद्र गाडगे, प्रमुख शास्त्रज्ञ, ९९२२४९०४८३ (कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.