Solapur News: माढा तालुक्यात गुरुवारी (ता. १९) झालेल्या गारपीट, वादळी वारा व पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, द्राक्षे, बेदाणा, कांदा, ज्वारी, गहू यांसारख्या पिकांवर या आपत्तीचा मोठा परिणाम झाला असून, अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. विठ्ठलवाडी, लोंढेवाडी, मोडनिंब, उपळाई खुर्द, वडशिंगे या भागात गारपीट व वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. .नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप झालेले नसल्याने नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. अचानक आलेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून, पुढील हंगामासाठीही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. .Hailstorm Crop Damage: मराठवाड्यात गारपिटीचा साडेअकरा हजार हेक्टरवर फटका.प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. कृषी विभागाकडून गारपिटीचा अहवाल आलेला नाही. गारपीट नुकसानीबाबत कृषी विभागाकडून अहवाल आल्यानंतर पंचनामे करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांनी सांगितले..Unseasonal Rain Damage: बुलडाणा जिल्ह्यात गारपिटीमुळे ३,८०० हेक्टरवर पिकांचे नुकसान.मोहोळला आंबा, ज्वारी, द्राक्ष पिकांना फटकामोहोळ तालुक्यात गुरुवारी (ता. १९) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने ज्वारी, गहू, कांदा, आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या द्राक्षाचे घड भिजल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे वावरात काढून पडलेली ज्वारी, कांदा, गहू या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. .ज्वारी भिजल्याने ती काळी पडण्याची भीती आहे, तर कडबाही काळा पडला आहे. गहू भिजल्याने तो मळणीसाठी वेळ लागणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढून तो कापून ठेवला आहे. मात्र, गुरुवारच्या पावसाने तो भिजून व वरचे आवरण भिजल्याने तो कमी दारात विकला जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. मोठ्या केळीची पानेही फाटली आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.