Farmer Loss: ऐन सणासुदीच्या दिवशी अस्मानीचा आपत्तीचा फटका नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. गुरुवारी (ता. १९) आणि शुक्रवारी (ता. २०) सलग दोन दिवस जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून तातडीने पंचनामे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे..प्रामुख्याने मालेगाव, बागलाण व निफाड तालुक्यात अनेक गावांना गारपिटीने झोडपले. काढणीला आलेला गहू जमिनीला आडवा झाला असून, वाऱ्याच्या वेगामुळे पिकांचे तो पडला आहे. रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा काढणीच्या अंतिम टप्प्यात असताना पाणी साचल्याने सडण्याची भीती निर्माण झाली आहे. टोमॅटो, पालेभाज्या आणि इतर भाजीपाला पिकांचे गारपिटीमुळे नुकसान समोर आले आहे. चांदवड तालुक्यातील पश्चिम भागात देखील हलका पाऊस झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले..Unseasonal Rain: अवकाळी, गारपिटीचे शेतकऱ्यांवर संकट, पीक नुकसानीचे तातडीने मुल्यांकन करण्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांचे निर्देश.बागलाण तालुक्याला पुन्हा फटकाबागलाण तालुक्यात पश्चिम आदिवासी भागासह मुल्हेर, अंतापूर, ताहाराबाद पिंपळकोठे, भडाणे, दसवेल शिवारात सलग दुसऱ्या दिवशी पूर्वमोसमी गारांचा पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मुल्हेर, मुंगसे, नरकोळ, जाखोड, विजयनगर, मोराणे, पिंगळवाडे, .Unseasonal Rain: अवकाळी पाऊस, वादळाचा पश्चिम विदर्भात तडाखा.शेवरे, ताहराबाद, दसवेल, पिंपळकोठे, भड़ाने, सोमपुर बतसेच जायखेडा, आसखेडा, गोराणे, नामपूर, खीरमाणी, कुपखेडा परिसरात गारांचा पाऊस झाल्यामुळे कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो इत्यादी पिके व आंबा, चिकूचे नुकसान झाले आहे. वारा विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे अनेक गावात वीजपुरवठा खंडित झाला होता. मालेगाव तालुक्यात गारांचा सडा पडला होता. अजंग, वडेल, काष्टी, .वडनेर आदी काटवन परिसरात गारांचा फटका बसला. गहू, हरभरा या पिकांसह कांदा व डाळिंबाचे मोठे नुकसान झाले. डाळिंबाची लहान फळे गारांच्या तडाख्यात तुटून पडले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात देखील वादळी वाऱ्यामुळे मक्याचे पीक भुईसपाट झाले आहे..गुढीपाडव्याच्या आनंदावर विरजण पडले आहे.वर्षभर राबून पदरात काही पडेल अशी आशा होती, पण गारांनी सर्व काही हिरावून नेले. आता सरकारनेच शेतकऱ्यांना आधार द्यावा.- शेखर पवार, शेतकरी, पिंपळगाव, ता. मालेगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.